नांदेडमध्ये अफूचा अड्डा उद्ध्वस्त, 111 किलो पॉपी स्ट्रॉ जप्त, आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय, NCB ची मोठी कारवाई!

गांजा तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नांदेडमधील अफू तयार करण्याचा कारखाना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उद्वस्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज निर्मिती होत होती आणि इथून अनेक राज्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, असे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले आहे.

नांदेडमध्ये अफूचा अड्डा उद्ध्वस्त, 111 किलो पॉपी स्ट्रॉ जप्त, आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय, NCB ची मोठी कारवाई!
नांदेडमध्ये अफूच्या कारखान्यावर एनसीबीची धाड


नांदेडः शहर आणि परिसरातून जप्त करण्यात आलेल्या 1127 किलो गांजापोठपाठ एनसीबीने (NCB Raid) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी एनसीबीच्या पथकाने शहरात एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (Transport) आड सुरु असलेल्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून हेरॉइन बनवण्यासाठी लागणारे 111 किलो पॉपी स्ट्रॉ (खसखसचा पेंढा), नोटा मोजण्याचे मशीन आणि अफू जप्त करण्यात आले. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली.

आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय

नांदेड येथील कामठा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून 2 मशीन्सदेखील हस्तगत करण्यात आल्या असून 1.55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक झाली असून त्यात एक मुख्य आरोपी व अन्य दोन सहकारी आहेत. ड्रग्स निर्मिती आणि विक्री करणारी ही आंतरराज्यीय टोळी असून मुख्य आरोपी या फॅक्टरीचा मालक होता. तो ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचा. ही टोळी राज्याबाहेरदेखील ड्रग्ज पुरवत असल्याचा संशय समीर वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानातून अवैधरित्या माल नांदेडमध्ये

या फॅक्टरीत ड्रग्ज तयार करण्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतून अवैध पद्धतीने पॉपी स्ट्रॉ नांदेडमध्ये आणण्यात आले होते. हे पॉपी स्ट्रॉ ताजे असताना यातून बाहेर येणाऱ्या पदार्थातून अफू बनवली जाते. तर हे पॉपी स्ट्रॉ सुकल्यानंतर त्याचा वापर हेरॉइन बनवण्यासाठी केला जातो. या फॅक्टरीत ड्रग्ज तयार केल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरवले जात होते, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले

सावधान! टेन्शन कायम, कोरोनाचं संकट वाढतंय, केरळात रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI