सावधान! टेन्शन कायम, कोरोनाचं संकट वाढतंय, केरळात रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ

कोरोना विषाणू संसर्गामुळं यूरोपमधील काही देशात पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं समोर आलेलं आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढत असताना भारतात  कोरोना रुग्णसंख्या कमी होतं असल्याचं समोर आलं होतं.

सावधान! टेन्शन कायम, कोरोनाचं संकट वाढतंय, केरळात रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ
corona


नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गामुळं यूरोपमधील काही देशात पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं समोर आलेलं आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढत असताना भारतात  कोरोना रुग्णसंख्या कमी होतं असल्याचं समोर आलं होतं. मात्र, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मंगळवारी केरळमध्ये 4972 रुग्ण आढळले आहेत तर 370 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळं टेन्शन वाढलं

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय तर दुसरीकडे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं टेन्शन वाढलं आहे. केरळमध्ये मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 972 रुग्ण समोर आले आहेत. तर, 370 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात समोर आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सोमवारी केरळमध्ये 3698 रुग्णसंख्या आढळून आले होते. तर, मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये आतापर्तंय 50 लाख 97 हजार 845 रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या तिरुअंनतपुरममध्ये

केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या तिरुअनंतपुरममध्ये आढळून आली आहे. मंगळवारी या जिल्ह्यात 927 , तर त्रिशुरमध्ये 619, कोझिकोडेमध्ये 527 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात 766 कोरोना रुग्ण

कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 766 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, मंगळवारी 929 जणांना कोरोनामुक्त झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 64 लाख 77 हजार 379 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या 9 हजार 493 रुग्ण आढळले आहेत.

ओडिशात 82 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

ओडिशात दोन शैक्षणिक संस्थांमधील 82 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींचा देखील सहभाग आहे. संबलपूरमधील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मधील 29 विद्यार्थिनींना कोरोना संसर्ग झाला आहेत. तर सुंदरगढ येथील सेंट मेरी हायस्कूलच्या 53 विद्यार्थिनींना संसर्ग झालाय.

राजस्थानात कोरोना रुग्ण वाढले

राजस्थानात गेल्या 24 तासांमध्ये 23 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 रुग्ण जयपूरमध्ये तर 4 रुग्ण अजमेरमध्ये आढळले होते. राज्यात 136 सक्रियी रुग्ण आढळले आहेत. राजस्थानात 8955 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या:

इतर बातम्या:

रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी

Covid Capsule: मेड-इन-इंडिया COVID कैप्सूलला आपत्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी मिळणार, सुरुवातीला 2000 ते 4000 रु किंमत असेल

corona virus update 4972 corona cases record in Kerala 766 corona cases recorded

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI