AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिंदे गटाची महायुती, ठाकरे गट एकाकी; लांज्यात नेमकं काय घडतंय?

लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार आहे. ठाकरे गटाविरोधात सर्व पक्षीय पॅनल एकवटलं आहे.

मोठी बातमी ! पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिंदे गटाची महायुती, ठाकरे गट एकाकी; लांज्यात नेमकं काय घडतंय?
पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिंदे गटाची महायुतीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2023 | 12:23 PM
Share

रत्नागिरी: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात अडिच वर्ष सत्ताही स्थापन केली. यापुढेही ही आघाडी कायम ठेवण्याचा निर्धारही या तिन्ही पक्षांनी केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक अनोखीच महायुती जन्माला आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला वगळून ही महायुती जन्माला आली आहे.

लांजा तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे. 17 जागांसाठी मतदान होत असून एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही एक छोटी निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खरेदी विक्री संघावर आपला वरचष्मा राहावा म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपली गणितं मांडली असून त्यानुसार काम करत आहेत.

लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र अनोखी युती झालेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना होईल अशी अपेक्षा होती. भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्रं दिसेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, अनोख्या महायुतीमुळे केवळ लांज्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार आहे. ठाकरे गटाविरोधात सर्व पक्षीय पॅनल एकवटलं आहे. या पॅनलला सहकार पॅनल असं नाव देण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ लांजा गावचे ग्रामदैवत श्री देव चव्हाटा तसेच देव केदारलिंग मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.

लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरोधात सर्वपक्षीयांचे सहकार पॅनल उभे ठाकले आहे. एकूण 17 जागांसाठीची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...