आमदार आशुतोष काळे यांना कोरोना, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारताना झाली होती गर्दी, संसर्ग वाढणार ?

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे कोरोना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमदार आशुतोष काळे यांना कोरोना, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारताना झाली होती गर्दी, संसर्ग वाढणार ?
ASHUTOSH KALE
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 10:53 PM

अहमदनगर : साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे कोरोना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिलीय. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काळे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे सुरु केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साई संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारले होते. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (ncp mla ashutosh kale tested corona positive after taking two dose of corona vaccine)

पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसांनी कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे आमदार तसेच साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश्य लक्षणं जाणवत होती. मात्र आता चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती काळे यांनी ट्विटरवर दिलीय. तसेच मी लवकरच बरा होईल. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

अध्यक्षपद स्वीकारताना कार्यक्रमात मोठी गर्दी, संसर्ग वाढणार ?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जाहीर कार्यक्रमात त्यांनी साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत संस्थानचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात विश्वस्त, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आता आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काळे यांनी कोव्हीशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

आशुतोष काळे साई संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळात कोण-कोण?

1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6. सचिन रंगराव गुजर – सदस्य
7. राहुल कनाल – सदस्य
8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

इतर बातम्या :

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम ?

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

VIDEO : नीरज चोप्रा एक त्याची रुपं अनेक, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरीनंतर जाहिरातीत दाखवला जलवा, अभिनय पाहून चकित व्हाल!

(ncp mla ashutosh kale tested corona positive after taking two dose of corona vaccine)