AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम ?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला का आक्षेप आहे ? याची चर्चा होऊ लागली आहे. सोमय्या या दौऱ्यात नेमकं काय करणार आहेत ? असं विचारलं जात आहे.

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम ?
किरीट सोमय्या, माजी खासदार
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 9:23 PM
Share

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर नोटीस दिली आहे. मात्र, काहीही झालं तरी मी कोल्हापूरला जाणाराच. माझा नियोजित दौरा पूर्ण करणारच असा निश्चय सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या भूमिकेमुळे त्यांना थांबवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ते कोल्हापूरकडे रवाना झाले असले तरी त्यांना कोल्हापुरात जाण्यापूर्वीच रोखले जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला का आक्षेप आहे ? याची चर्चा होऊ लागली आहे. सोमय्या या दौऱ्यात नेमकं काय करणार आहेत ? असं विचारलं जात आहे. (kirit somaiya will visit for places in four days know all about his allegations and criticism)

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री तसेच नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. नुकतंच त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय. याच कथित गैरव्यवहाराची सखोल माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरला जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे

किरीट सोमय्या चार दिवसांसाठी दौऱ्यावर आहेत. 20 सप्टेंबरला कोल्हापुरात जाऊन सोमय्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत. तसचे 23 सप्टेंबपरला ते पारनेरमधील आणखी एका साखर कारखान्याला भेट देतील. तसेच या सारख कारखान्याचीही सर्व माहिती ते जाणून घेतील. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी अलीबाग येथे जाऊन रश्मी ठाकरे यांच्या अलीबागच्या गोलाई येथील बंगल्याची पाहणी करतील. तसेच शेवटीच 30 सप्टेंबर रोजी सोमय्या उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार आहेत. या सर्व ठिकाणांवर आर्थिक गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या कोल्हापूरकडे रवाना

दरम्यान, सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा चांगलाच चर्चेत आहे. सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी मुंबई पोलीस जमेल तो प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी कोल्हापूरला जाणारच अशी ठाम भूमिका सोमय्या यांनी घेतलेली आहे. सध्या ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसलेले असून कोल्हापूरकडे निघाले आहेत.

इतर बातम्या :

किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम ! अमोल मिटकरी म्हणतात ‘…तर विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका’

प्रेयसीने त्याच्यासाठी घर विकलं, पैसे दिले, पण प्रियकराने तिच्या तीनही लेकरांसह तिला संपवलं, युपीतल्या चार हत्यांचं ठाणे कनेक्शन

VIDEO : नीरज चोप्रा एक त्याची रुपं अनेक, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरीनंतर जाहिरातीत दाखवला जलवा, अभिनय पाहून चकित व्हाल!

(kirit somaiya will visit for places in four days know all about his allegations and criticism)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.