जळगाव पालिकेचं कार्यालय पाहून नीलम गोऱ्हेही भारावल्या, ‘ही’ आहेत 17 मजली इमारतीची वैशिष्ट्ये

| Updated on: Aug 07, 2021 | 8:02 AM

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी जळगाव महापालिकेला भेट देत तेथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी जळगाव महापालिकेची 17 मजली इमारत पाहून नीलम गोऱ्हे देखील भारावून गेल्या.

जळगाव पालिकेचं कार्यालय पाहून नीलम गोऱ्हेही भारावल्या, ही आहेत 17 मजली इमारतीची वैशिष्ट्ये
Follow us on

जळगाव : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी जळगाव महापालिकेला भेट देत तेथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी जळगाव महापालिकेची 17 मजली इमारत पाहून नीलम गोऱ्हे देखील भारावून गेल्या. तसेच या महापालिकेत जयश्री महाजन यांच्या रुपाने शिवसेनेच्या महापौर असल्याचा मनस्वी आनंद असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी जळगाव विकासनिधी देण्यासंदर्भातही आश्वासन दिलं.

डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, “जळगाव महापालिकेच्या या 17 मजली इमारतीत येऊन मी पूर्णपणे भारावले. या महापालिकेत जयश्री महाजन यांच्या रूपाने शिवसेनेची महापौर असल्याचा मनस्वी आनंद आहे. त्या निश्चितपणे चांगले कार्य करून जळगावचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वास वाटतो. महापालिका ज्याप्रमाणे मुंबई, संभाजी नगर महापालिकेत एकहाती शिवसेनेची सत्ता आहे त्याप्रमाणेच जळगाव महापालिकेतही कामे करावीत.”

“उपसभापती नात्याने मीसुद्धा महापालिकेच्या मदतीसाठी लक्ष घालेल. तसेच जळगाव महापालिकेला विकासनिधी देण्यासंदर्भात एकनाथ शिंदे व नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांशीही चर्चा करू,” असं आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले.

नीलम गोऱ्हे यांनाही भारावून टाकणाऱ्या पालिका इमारतीची वैशिष्ट्ये काय?

जळगाव महापालिकेची स्वमालकीची 17 मजली इमारत आहे. शिवसेना नेते माजीमंत्री सुरेश जैन यांच्या पुढाकारातून ही इमारत बांधली गेली आहे. जळगाव पालिकेची ही 17 मजली इमारत आशिया खंडातील सर्वात मोठी इमारत असल्याचंही सांगितलं जातंय. जळगाव शहर महानगरपालिका 21 मार्च 2003 रोजी स्थापन करण्यात आली. आशा कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला. जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ 68.78 चौरस किमी आहे. या अंतर्गत 4.06 लाख लोकांना बांधकाम व नागरी सुविधा देण्यात येते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे महापालिकेतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापौर दालनात डॉ. नीलम गोर्‍हे यांचा महापौर जयश्री महाजन यांनी श्रावण मासानिमित्त माहेरची खास पैठणी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच महाजन यांनी महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंत‘कोरोना-19’च्या काळात केलेल्या कार्याचा अहवालही त्यांना सादर केला. याचवेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही पुष्पगुच्छ देऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला.

हेही वाचा :

जळगावात फी न भरल्याने शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं, जि.प. सभापतींकडून कारवाईचा इशारा

VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो

सावखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेची जळगावात चर्चा, ‘ओट्यावर शाळा’ उपक्रमाद्वारे शिक्षणाची गाडी सुसाट

व्हिडीओ पाहा :

Neelam Gorhe praise 17 story Jalgaon Municipal corporation office