Pankaja Munde : कोई मुझे पसंद करे या ना करे… पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? कुणावर साधलाय निशाणा?

ड्रग्स आतंक वादापेक्षाही घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच कोई मुझे पसंद करे या ना करे... असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांचा हा टोला भाजपला असल्याचं सांगितलं जात आहे.

Pankaja Munde : कोई मुझे पसंद करे या ना करे... पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? कुणावर साधलाय निशाणा?
Pankaja MundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:28 AM

बीड: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं. तसेच फडणवीस यांच्यासोबतच्या कार्यक्रमात का नसते याचं कारणही सांगितलं. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. कोई मुझे पसंद करे या ना करे. या जगात मी कुणालाच घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा निशाणा नेमका कुणावर आहे? अशी चर्चा आता रंगली आहे.

अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांनी या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरेही दिली. यावेळी झालेल्या भाषणात पंकजा मुंडे नेमक्या कोणाला घाबरतात याचं रहस्य त्यांनी उलगडले आहे.

हे सुद्धा वाचा

मी या जगात कोणालाही घाबरत नाही. पण माझा मुलगा आर्यमान याला खूप घाबरते कारण आजच्या पिढीची बुद्धी फार तीक्ष्ण आहे. त्यामुळे वाद घालण्यात अर्थच नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ड्रग्सपासून दूर राहा

यावेळी समाजात घडणाऱ्या काही अप्रिय घटनेवर पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यात प्रामुख्याने ड्रग्स पासून दूर राहा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. ड्रग्स आतंक वादापेक्षाही घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच कोई मुझे पसंद करे या ना करे… असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांचा हा टोला भाजपला असल्याचं सांगितलं जात आहे.

पावभाजीचा अस्वाद

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांनी परळीतून टीव्हीवर केंद्रीय अर्थसंकल्प पाहिला. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागतही केलं.

त्यानंतर दिवसभरातील आपले दौरे आटपून झाल्यानंतर पंकजांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव भाजी सेंटरला भेट दिली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांसह पावभाजीवर ताव मारला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.