Chandrapur Crime | प्रेमप्रकरणातून युवतीने घेतले विष, पोलिसांनी वेळेवर रुग्णालयात दाखल केले; युवतीचा जीव वाचला

| Updated on: May 11, 2022 | 2:24 PM

परवेश पठाण व मंगेश सायंकार असे तत्पर पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. विष घेतल्यानंतर रुग्ण लवकर दगावण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी त्यांना योग्य वेळी उपचार मिळाले पाहिजे. या युवतीला पोलिसांना अगदी वेळेवर मदत केली. तिला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळं तिचा जीव वाचला.

Chandrapur Crime | प्रेमप्रकरणातून युवतीने घेतले विष, पोलिसांनी वेळेवर रुग्णालयात दाखल केले; युवतीचा जीव वाचला
प्रेमप्रकरणातून युवतीने घेतले विष
Image Credit source: t v 9
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरभर कौतुक (Police Staff Appreciation) होत आहे. एका 21 वर्षीय मुलीने प्रेमप्रकरणात ऑल आउट डास नाशक द्रव्य घेतले होते. एका फ्लॅटमधील या घटनेची माहिती दुचाकीवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना डायल 112 नंबरवरून प्राप्त झाली. क्षणाचाही विलंब न करता परवेश पठाण आणि मंगेश सायंकार या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक रामनगर पोलीस ठाण्याला (Ramnagar Police Thane) त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी मदत मागितली. मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणीच्या मदतीने त्यांनी पीडितेला ताबडतोब दुचाकीनेच रुग्णालयात हलविले. गोल्डन अवर्समध्ये (Golden Hours) उपचार मिळाल्याने ही मुलगी वाचली. तातडीने निर्णय घेत मुलीला मदत दिल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.

काय आहे प्रकरण

एका युवतीने प्रेमप्रकरणातून विष घेतले. याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्परतेने त्यांनी घटनास्थळ गाठले. हे पोलीस दुचाकीने कर्तव्यावर होते. त्यांना पोलिसांची मदत मागितली. मुलीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. वेळेवर उपचार झाल्यानं युवतीचं प्राण वाचले. याबद्दल पोलिसांचा कौतुक होतेय.

वेळेवर उपचार महत्त्वाचा

परवेश पठाण व मंगेश सायंकार असे तत्पर पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. विष घेतल्यानंतर रुग्ण लवकर दगावण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी त्यांना योग्य वेळी उपचार मिळाले पाहिजे. या युवतीला पोलिसांना अगदी वेळेवर मदत केली. तिला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळं तिचा जीव वाचला. या दोन्ही पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी सन्मानित केले.

हे सुद्धा वाचा