Jalgaon Accident : जळगावात मदतीच्या मागणीसाठी आलेल्या कुटुंबीयांवरच पोलिसांचा लाठीचार्ज, मृतदेहाची विटंबना

घोडसगावच्या हायवे क्रमांक 6 वर दुधाने भरलेला टॅंकर अपघातात पलटी झाला होता. या टँकरमधील दूध खाली करण्यासाठी दुसरा ट्रक घटनास्थळी आला होता. अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध खाली करण्याचं काम तरुण मजुरांकडून सुरु होतं. हे सर्व मजूर ट्रकवर बसून दूध खाली करत होते. याचदरम्यान एक भरधाव वेगात तिसरा ट्रक आला आणि त्याने टँकरला जोरदार धडक दिली.

Jalgaon Accident : जळगावात मदतीच्या मागणीसाठी आलेल्या कुटुंबीयांवरच पोलिसांचा लाठीचार्ज, मृतदेहाची विटंबना
जळगावात मदतीच्या मागणीसाठी आलेल्या कुटुंबीयांवरच पोलिसांचा लाठीचार्जImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 1:07 AM

जळगाव : मुक्ताईनगरमधील घोडसगाव येथे गुरुवारी मध्यरात्री दुधाचा ट्रक आणि टेम्पो झालेल्या भीषण अपघाता (Accident)त पाच जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. यापैकी चौघे जण धुळे जिल्ह्यातील तर एक जण जळगावमधील आहे. मृतांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघात काम करणार्‍या कर्मचारी धनराज सुरेश बिरारी (37) यांचा समावेश आहे. दरम्यान मृतास आर्थिक मदत (Help) मिळावी यासाठी मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह थेट दूध संघाच्या आवारात आणला. पाच तास उलटून देखील मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट दूध संघात ठेवला. यावेळी पोलिसांनी मयताच्या कुटुंबियांवर लाठीचार्ज केल्याने धावपळ उडाली. या दरम्यान मात्र मृतदेहाची अक्षरशः विटंबना झाल्याचे हृदय हेलावणारी दृश्य पाहायला मिळाले.

काय आहे नेमकी घटना ?

घोडसगावच्या हायवे क्रमांक 6 वर दुधाने भरलेला टॅंकर अपघातात पलटी झाला होता. या टँकरमधील दूध खाली करण्यासाठी दुसरा ट्रक घटनास्थळी आला होता. अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध खाली करण्याचं काम तरुण मजुरांकडून सुरु होतं. हे सर्व मजूर ट्रकवर बसून दूध खाली करत होते. याचदरम्यान एक भरधाव वेगात तिसरा ट्रक आला आणि त्याने टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टँकरवर बसलेल्या पाचही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील मृतांपैकी धनराज बिरारी यांच्या कुटुंबीयांनी दूध संघाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. मात्र दूध संघाकडून मदत मिळत नसल्याने नातेवाईकांनी दूध संघाच्या आवारातच मृतदेह आणला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज सुरु केला. यामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि यात मृतदेहाचीही विटंबना झाली.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.