
रत्नागिरी : कोळकेवाडी धरणातून (Dam) 2000 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतोयं. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे ही ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतंय. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नद्यांना पूर येतोयं. आता कोळकेवाडीच्या धरणातून तब्बल 2000 क्यूसेक पाणी (Water) सोडण्यात येणार आहे. मात्र, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नाही तर वाशिष्ठी नदीपात्रात वाढणारे पाणी याचा अभ्यास करण्यासाठी पाणी सोडले जातंय.
कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीपात्रात नागरिकांना न उतरण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठच्या गावांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलायं. कारण धरणातून 2000 क्यूसेक पाणी सोडल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. वाशिष्ठी नदीपात्रात वाढणारे पाणी याचा अभ्यास करण्यासाठी पाणी सोडले जातंय.
पाऊस नसताना अचानक काही किलो मीटरपर्यंत नदीच्या प्रवाहात पाणी वाढणार असल्याने नदीपात्रात न उतरण्याचे आणि सतर्कतेच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 2000 क्यूसेक पाणी सोडल्यानंतर धरणाचे दरवाजे प्रशासनाकडून बंद केले जाणार आहेत. वाशिष्ठी नदीपात्रात वाढणारे पाणी अभ्यास करण्यासाठी सोडले जाणार असल्याचे प्रशानाकडून स्पष्ट करण्यात आले.