गोंदियातील शेतकऱ्यांना दिलासा; आता तालुक्यातील कुठल्याही शासकीय केंद्रात करता येणार धान विक्री

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना आता तालुक्यातील कुठल्याही शसकीय धान खरेदी केंद्रात आपले धान विकता येणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आदेश काढण्यात आले आहेत.

गोंदियातील शेतकऱ्यांना दिलासा; आता तालुक्यातील कुठल्याही शासकीय केंद्रात करता येणार धान विक्री
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 7:27 AM

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना आता तालुक्यातील कुठल्याही शसकीय धान खरेदी केंद्रात आपले धान विकता येणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आदेश काढण्यात आले आहेत. याचा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पूर्वी ज्या  गावाचा समावेश ज्या धान केंद्रातंर्गत करण्यात आला असेल त्याच केंद्रात धान विकता येत असे. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून, कुठल्याही शासकीय केंद्रावर धान विकता येणार आहे. याचा फायदा म्हणाजे आता धान केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

पायपीट वाचली

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. ज्या गावाचा समावेश ज्या केंदात असेल तिथेच शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागत होती. मात्र, बऱ्याच गावांचा समावेश जवळच्या केंद्रात नसल्याने शेतकऱ्यांना 15 ते 20  किमीपर्यंत पायपीट करावी लागत होती. यामुळे  शेतकऱ्याचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. धान विक्री प्रक्रियेतील अशा अडचणी टाळण्यासाठी आता कुठल्याही धान खरेदी केंद्रावर आपले पीक विकण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

वाहतूक खर्चात होणार बचत

घरापासून दूर असलेल्या धान केंद्रात जर नंबर लागला तर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे धान विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. अखेर अन्न व नागरि पुरवठा मंत्रालयाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे. आता यापुढे शेतकऱ्यांना कुठल्याही केंद्रात आपले धान विकता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत तसेच वाहतूक खर्चात बचत होईल.

संबंधित बातम्या

Zodiac Signs | अ‍ॅन्ग्री बर्ड असतात या 4 राशींच्या व्यक्ती, यांच्याशी पंगा घेऊच नका

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

पगार वाढीनंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; गाजर दाखवत केला सरकारचा निषेध