Maharashtra News LIVE Update | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल 

राज्य सरकाने येत्या एक डिसेंबरपासून शाळा सुर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे (Maharashtra school reopening) वर्ग सुरु केले जाणार आहेत. शालेय शिक्षममंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Maharashtra News LIVE Update | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल 
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आंदोलनातून भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाचे नेतृत्व आता गुणरत्वन सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याकडे आले असून एसटी कर्मचारी विलीनकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच आज राज्य सरकाने येत्या एक डिसेंबरपासून शाळा सुर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे (Maharashtra school reopening) वर्ग सुरु केले जाणार आहेत. शालेय शिक्षममंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यासह महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स जाणून घ्या फक्त टीव्ही 9 मराठीवर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 25 Nov 2021 22:30 PM (IST)

  रत्नागिरीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, कोणतीही हानी नाही

  रत्नागिरी- रात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

  रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

  भूकंपामुळे कोणतीही हानी नाही, प्रसासनाची माहिती

  महिन्याभराच्या आता भूकंपाचा तिसरा धक्का

 • 25 Nov 2021 20:18 PM (IST)

  औरंगाबाद ट्रॅफिक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

  औरंगाबाद : कन्नड चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केली जोरदार वसुली

  ट्रॅफिक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

  ट्रक ड्रायव्हर बनून मंगेश चव्हाण यांनी केलं पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन

  प्रति गाडी 500 रुपये वसुली करणारे पोलीस आणि झिरो पोलीस कॅमेऱ्यात कैद

  चाळीसगाव घाटातून अवजड वाहनांसाठी घेतले जात होते प्रत्येकी 500 रुपटे

  चाळीसगाव घाट धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी केला होता बंद

  मात्र पैसे घेऊन ट्रॅफिक पोलीस धोकादायक घाटातून सोडत होते अवजड वाहने

  भाजप आमदाराने उघड केला ट्रॅफिक पोलिसांचा गोरख धंदा

  आमदारांनी धरपकड करताच पोलिसांची झाली धावपळ

 • 25 Nov 2021 20:12 PM (IST)

  किला कोर्टाने फरार घोषित केल्यानंतर परमबीर सिंह पहिल्यांदाच माध्यमांसमोर

  मुंबई किला न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. कांदिवली गुन्हे शाखेनं सिंह यांची आज तब्बल सात तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी आज तपासासाठी हजर झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मला आदर आहे. जसा कोर्टाचा आदेश आहे त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे. याशिवाय आपल्याला काही बोलायचं नसल्याचं सिंह म्हणाले.

 • 25 Nov 2021 19:38 PM (IST)

  औरंगाबादेत ट्रॅफिक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

  औरंगाबाद : कन्नड चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केली जोरदार वसुली

  ट्रॅफिक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

  ट्रक ड्रायव्हर बनून मंगेश चव्हाण यांनी केलं पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन

  प्रति गाडी 500 रुपये वसुली करणारे पोलीस आणि झिरो पोलीस कॅमेऱ्यात कैद

  चाळीसगाव घाटातून अवजड वाहनांसाठी घेतले जात होते प्रत्येकी 500 रुपये

  चाळीसगाव घाट धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी केला होता बंद

  मात्र पैसे घेऊन ट्रॅफिक पोलीस धोकादायक घाटातून सोडत होते अवजड वाहने

  भाजप आमदाराने उघड केला ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश

  आमदारांनी धरपकड करताच पोलिसांची झाली धावपळ

 • 25 Nov 2021 19:33 PM (IST)

  उस्मानाबादेतील तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय

  उस्मानाबाद – जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी बातमी

  तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय

  आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे

  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

  तेरणा कारखाना भाडेतत्वावर दिल्याने शेतकरी व सभासद यांना दिलासा

  2008 पासून गेल्या 13 वर्षांपासून बंद असलेला तेरणा सुरू होणार

 • 25 Nov 2021 18:20 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त

  नाशिक- नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त

  – जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गांवर पोलिसांची असणार गस्त

  – नाशिक जिल्ह्यातील st च्या सुरक्षेसाठी तब्बल 650 पोलीस कर्मचारी तैनात

  – कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल

  – नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांची माहिती

 • 25 Nov 2021 17:33 PM (IST)

  सांगलीत 109 ग्रॅम कोकेन जप्त, एकाला अटक

  सांगली : सांगलीत 109 ग्रॅम कोकेन जप्त

  सांगली पोलिसांची मोठी कारवाई

  टांझानिया येथील व्यक्तिला कोकेनसह अटक

  माकेटोजॉनझाकिया असे या व्यक्तीचे नाव

  109 ग्रॅम कोकेणचे कॅप्सूल जप्त

  व्हॅसलीनच्या बाटलीत लपविले होते कोकेण

  सांगली पोलिसांनी पेठनका येथे केली कारवाई

  संशयितास 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

  पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती

 • 25 Nov 2021 17:21 PM (IST)

  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल 

  पुणे : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

  – अण्णांना कुठलाही त्रास होत नसल्याची हॉस्पिटलकडून माहिती

  – रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्णांच्या तपासण्या

  – दर तीन महिन्यांनी अण्णा हजारे यांचे रुटीन चेकअप केले जाते

  – कोरोनामुळे वर्षभरात अण्णांनी रूटीन चेकअप केले नव्हते

 • 25 Nov 2021 17:02 PM (IST)

  शाळा सुरू करण्याला पुण्यातील पालक संघटनांचा विरोध

  पुणे – शाळा सुरू करण्याला पुण्यातील पालक संघटनांचा विरोध

  – आधी विद्यार्थ्यांचे लसीकरण करा मगच शाळा सुरू करा

  – अन्यथा शाळा सुरु न करण्याची मागणी

  – सरकार मुलांच्या लसीकरणावर का भर देत नाही, पालकांचा सवाल ?

  – सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार  करावा पालक संघटनांची मागणी

 • 25 Nov 2021 16:49 PM (IST)

  राज्यात 1 ली ते 12 पर्यंतचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरु होतील : वर्षा गायकवाड

  राज्यात 1 ली ते 12 पर्यंतचे लवकरच सुरु होतील. मुलं अजून शाळेत आलेले नाहीत. एक डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येईल. एसओपीचे पालन कसे होईल याचं नियंत्रण अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मागील काळात विद्यार्थ्यांची खबरदारी घेतली होती. मुलं दीड ते दोन वर्षांपासून घरी आहेत. ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातील. मुलांची मानसिकता लक्षात घेऊन कशा प्रकारे वागले पाहिजे, यावर विचार सुरु आहे. सुरक्षितता आणि आरोग्य या गोष्टी प्रमुख असतील

 • 25 Nov 2021 16:31 PM (IST)

  अंबरनाथच्या पालेगाव परिसरात आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह

  अंबरनाथ : अंबरनाथच्या पालेगाव परिसरात आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह

  आनंद सागर रिसॉर्टजवळ पाईपलाईनजवळ आढळला मृतदेह

  पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला

  पोलिसांकडून मृतदेह कुणाचा आहे, तसंच ही हत्या आहे की आत्महत्या आहे? याचा तपास सुरू

 • 25 Nov 2021 16:21 PM (IST)

  राज्यात पहिली ते दहावीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरु होणार

  राज्यातील शाळा एक डिसेंबरपासून सुरु होणार

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

  पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार

 • 25 Nov 2021 12:19 PM (IST)

  आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची ‘टीव्ही-9’ला पसंती

  सोलापूर –

  आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची ‘टीव्ही-9’ला पसंती

  सोलापूर विभागातील आंदोलक कर्मचारी मोबाईल पाहत आहेत टीव्ही 9

  मुंबईतील आझाद मैदानावरील प्रत्येक घडामोडीवर टीव्ही 9 च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नजर

 • 25 Nov 2021 12:16 PM (IST)

  शरद पवार कष्टकरांना तोडण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्ही नापास झालात – गुणरत्न सदावर्ते

  वकील गुणरत्न सदावर्ते

  शरद पवार तुम्ही फार हुशार आहात

  तुम्ही जे काल तोडण्याचं काम केलं

  कालच्या कष्टकरांना तोडण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्ही नापास झालात

 • 25 Nov 2021 12:07 PM (IST)

  पडळकर आणि खोत यांना एसटी महामंडळाचा कष्टकरी कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहेत – सदावर्ते

  काही वेळावपूर्वी पोलिसांच्या गराड्यात एक पत्रकार परिषद झाली

  आमचे दोन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद झाली

  पडळकर आणि खोत यांना एसटी महामंडळाचा कष्टकरी कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहेत

  ही लोक चळवळ आहे

  पडळकर, खोतांची स्वत:पूर्ती ती स्थगिती दिली

   

 • 25 Nov 2021 12:04 PM (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या 40 आत्महत्या नव्हे, तर इन्स्टिट्युशनल हत्या – गुणरत्न सदावर्ते

  वकील गुणरत्न सदावर्ते

  ज्या ४० बांधवांनी या लढ्यासाठी कुर्बानी दिली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद पवार, विश्वास नांगरे पाटील हे स्टेटचं फेल्युअर आहे

  त्या ४० आत्महत्या नव्हत्या त्या इन्स्टिट्युशनल हत्या आहेत

  हा लढा मानवाधिकाराचा आहे

   

   

 • 25 Nov 2021 11:40 AM (IST)

  चिखली शहरातील दरोडा आणि व्यापारी कमलेश पोपट हत्या प्रकरण

  बुलडाणा

  चिखली शहरातील दरोडा आणि व्यापारी कमलेश पोपट हत्या प्रकरण

  प्रकरणातील तीनही आरोपी पकडण्यात बुलडाणा पोलिसांना यश

  जुन्या वैमनस्यातून व्यापाराची हत्या की दरोड्याचा प्रयत्नातून हत्या?

  पोलीस तपासात होणार निष्पन्न

  पकडण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरु

 • 25 Nov 2021 11:29 AM (IST)

  पगारवाढ नको, विलीनीकरण हवं, नाशकातील कर्मचारी आंदोलनावर ठाम

  नाशिक –

  पगारवाढ नको, विलीनीकरण हवं, नाशकातील कर्मचारी आंदोलनावर ठाम

  कुणीही माघार घेणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एकच नारा

 • 25 Nov 2021 10:55 AM (IST)

  काही मागण्या मान्य झाल्यानं हा कामगारांचा मोठा विजय – खोत

  सदाभाऊ खोत –

  विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

  १५ दिवसांनंतर सरकारला जाग आलीये

  कामगारांना सरकारनं काल दिलासा दिलाय

  कामगारांचा हा पहिल्या टप्प्यातील विजय आहे

  विलिनीकरणाचा लढा कायम राहणार

  कामगारांचं निलंबन सरकारने मागे घेतलं

  काही मागण्या मान्य झाल्यानं हा कामगारांचा मोठा विजय

 • 25 Nov 2021 10:54 AM (IST)

  पगारवाढ हा ऐतिहासिक विजय, सदाभाऊ खोत

  हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो.  15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे.  17 हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना  23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे.

  राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम  देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. हा कामगारांचा मोठा विजय आहे.

 • 25 Nov 2021 10:16 AM (IST)

  महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता, तुमचं कतृ्त्व काय आहे – संजय राऊत

  कामगार समजून घेत आहेत

  पण एक विशिष्ट वर्ग आहे, त्यांची भाषा मी ऐकत होतो

  ते या राज्यातल्या आणि देशातल्य़ा वरिष्ठ आणि सन्माननिय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते

  यांची लायकी काय आहे, ते कोण लागून गेले

  महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कतृ्त्व काय आहे

  कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे

  अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली

   

 • 25 Nov 2021 10:10 AM (IST)

  एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का – संजय राऊत

  काल राज्य सरकारने, अनिल परबांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली

  या संपातून तोडगा काढण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी चांगली घोषणा केलीये

  याची तरतूदही होणार आहे

  तरीही कामगारांचे नेते आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत.

  एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का

  कष्टकरांचा नुकसान व्हावं हे आमचं सरकार कधीही विचार करणार नाही

  राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही आपण त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात देतोय

  कामगारांनीही थोडं समजुतीने घ्यावं

   

 • 25 Nov 2021 09:44 AM (IST)

  चंद्रपूर विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम

  चंद्रपूर –

  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम

  एकही कर्मचारी कामावर हजर नाही

  चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

  मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

  चंद्रपूरच्या एसटी कामगारांचा पवित्रा

 • 25 Nov 2021 09:34 AM (IST)

  आतापर्यंत अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन चालवलं – खोत

  सदाभाऊ खोत –

  आतापर्यंत अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन चालवलं

  सरकारने १५ दिवसांनंतर चर्चा केली

  तुम्ही हे आंदोलन सुरु केलंय आम्ही तुम्हाला समर्थन केलंय

  तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांशी बोलून तुमची भूमिका स्पष्ट करा

  आम्हीही आमची भूमिका स्पष्ट करु

  ११ वाजेपर्यंत आपण काय तो निर्णय घेऊ

   

 • 25 Nov 2021 09:18 AM (IST)

  आंबेगावतील हिंगेमला परिसरता गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

  पुणे

  – आंबेगावतील हिंगेमला परिसरता गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

  -ह्या बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत फस्त केले होते

  -जेरबंद बिबट्याला जुन्नर मधील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले

 • 25 Nov 2021 09:14 AM (IST)

  गोंदिया जिल्हयातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

  गोंदिया –

  गोंदिया जिल्हयातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

  विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही

  कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

 • 25 Nov 2021 09:14 AM (IST)

  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम

  बीड –

  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम

  एकही कर्मचारी कामावर हजर नाही

  बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

  मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

  बीडच्या एसटी कामगारांचा पवित्रा

 • 25 Nov 2021 09:14 AM (IST)

  मुक्ताईनगर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच एकही बस आज मुक्ताईनगर आगारातून निघाली नाही

  मुक्ताईनगर –

  मुक्ताईनगर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच एकही बस आज मुक्ताईनगर आगारातून निघाली नाही

  249 कर्मचारी संपात सहभागी आहेत आज संपाचा पंधरावा दिवस

  सर्वत्र बस स्थानक परिसरात शुकशुकाट

  विलगीकरण करण्यावर कर्मचारी अजूनही ठाम जोपर्यंत विलीगीकरण होत नाही तोपर्यंत असाच संप सुरू राहणार

 • 25 Nov 2021 08:59 AM (IST)

  नागपुरात हत्या सत्र सुरुच, आज पाहटेच्या सुमारास झाली एकाची हत्या

  नागपुरात हत्या सत्र सुरुच

  इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबाग परिसरात

  आज पाहटेच्या सुमारास झाली एकाची हत्या

  सुनील जवादे वय 46 वर्ष इसमाची धारधार शस्राने हत्या करण्यात आली

  हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही

  पोलीस तपास सुरु

 • 25 Nov 2021 08:58 AM (IST)

  गोंदिया जिल्हयातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

  गोंदिया जिल्हयातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

  विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही

  कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

 • 25 Nov 2021 07:36 AM (IST)

  यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्यानं प्रश्नपत्रिका रद्दीत विकण्याची वेळ

  यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्यानं प्रश्नपत्रिका रद्दीत विकण्याची वेळ,

  तब्बल 850 टन प्रश्नपत्रिका राज्य शिक्षण मंडळ रद्दीत विकणार,

  कोट्यवधी रुपयांचा खर्च या प्रश्नपत्रिका छपाईसाठी करण्यात आला होता ..्

  दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार होत्या तर बारावीच्या परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होणार होत्या,

  29 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीसाठी नोंदणी केली होती,

  ई लिलाव काढून प्रश्नपत्रिका विकण्याची तयारी राज्य शिक्षण मंडळानं सुरू केलीये.

  यासाठी ई लिलावाची प्रक्रिया सुरू झालीये

 • 25 Nov 2021 07:36 AM (IST)

  1 डिसेंबरपासून पुण्यातील विमानतळ 24 तास सुरू होण्याची शक्यता

  पुणे

  1 डिसेंबरपासून पुण्यातील विमानतळ 24 तास सुरू होण्याची शक्यता,

  सध्या धावपट्टीच्या कामामुळे सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतच विमानाची उड्डाणं होत होती…

  धावपट्टीच काम पुर्ण करण्यात आलंय,

  दिवसभरात सध्या 60 विमानांची उड्डाण होतायेत . तर 17 हजार प्रवाशांंची रोज विमानतळावरून ये जा होतीये,

  24 तास विमानतळ सुरू झाल्यास 90 विमानांची उड्डाण दिवसभरात होतील,

  1 तारखेपासून विमानतळ 24 तास सुरू होण्याची शक्यता

 • 25 Nov 2021 07:17 AM (IST)

  एसटी कर्मचारी विलीनीकरनावर ठाम, संतप्त आंदोलकांनी सरकारला गाजर दाखवत निषेध केला

  सांगली –
  विलीनीकरणाला बगल देण्यासाठी वेतनवाढीचा प्रस्ताव पुढे करत सरकारने आंदोलकांना गाजर दाखवले

  एसटी कर्मचारी विलीनीकरनावर ठाम, संतप्त आंदोलकांनी सरकारला गाजर दाखवत निषेध केला

 • 25 Nov 2021 06:48 AM (IST)

  ममता बॅनर्जी यांचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये

  ममता बॅनर्जी यांचा पॉलिटिकल स्ट्राईक

  काँग्रेस पक्षाचे 12 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये

  18 पैकी 12 आमदार ममता यांच्या पक्षात

  माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करणार

  मेघालय मध्ये ममता दिदींचा काँग्रेसला मोठा झटका

  निवडणूक न लढता मेघालय मध्ये तृणमूल काँग्रेस बनला विरोधी पक्ष

  उद्या दुपारी तृणमूल प्रवेशाबाबत होणार अधिकृत घोषणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI