‘तहसीलदार मॅडमचा मनमानी कारभार’, पारनेर महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!

| Updated on: Aug 25, 2021 | 2:53 PM

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढू लागल्या आहेत. देवरे यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरु केल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय.

तहसीलदार मॅडमचा मनमानी कारभार, पारनेर महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे
Follow us on

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढू लागल्या आहेत. देवरे यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरु केल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या

विशेष म्हणजे यात महिला कर्मचारी देखील सहभागी झाल्या आहेय. तहसीलदार मॅडमच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरु केल्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. तर देवरे यांच्या बदलीची मागणी करत एक तर त्यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा असा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

तहसीलदार देवरे या कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केलंय. सकाळी 11 वाजेपासून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलंय. तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.

लंके-तहसीलदार वादावर अण्णा हजारेंकडून भूमिका स्पष्ट

आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केलं आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रासा दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.

(Revenue staff aggressive against parner Tehsildar Jyoti Deore)

हे ही वाचा :

मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे

महिला तहसीलदाराच्या आरोपानं लंके चक्रव्युहात, इंदोरीकर महाराज म्हणतात, कुत्रे भुंकले तरी हत्ती चालत राहतो