Rupali Chakankar Dance Video : आदिवासी महिलांच्या स्वागतानं रुपाली चाकणकर भारवल्या, पारंपारिक नृत्यावर धरला ठेका

Rupali Chakankar Dance Video : आदिवासी महिलांच्या स्वागतानं रुपाली चाकणकर भारवल्या, पारंपारिक नृत्यावर धरला ठेका
रुपाली चाकणकर यांनी धरला ठेका

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar Dance) आदिवासी महिलांबरोबर पारंपारिक नृत्यावर ठेका धरला. चाकणकर यांचं गडचिरोलीतील महिलांनी स्वागत केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 11, 2021 | 9:00 AM

गडचिरोली:राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. रुपाली चाकणकर या काल गडचिरोलीच्या (Gadchiroli) दौऱ्यावर होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar Dance) आदिवासी महिलांबरोबर पारंपारिक नृत्यावर ठेका धरला. चाकणकर यांचं गडचिरोलीतील महिलांनी स्वागत केलं.

पाहा व्हिडीओ

रुपाली चाकणकर विदर्भातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन महिलांचे प्रश्न जाणून घेत आहेत. काल त्या गडचिरोली दौऱ्यावर असताना आदिवासी महिलांनी रुपाली चाकणकरांचं पारंपारिक पद्धतीनं स्वागत केलं. आदिवासी महिलांनी नृत्य सादर करून स्वागत रुपाली चाकणकर यांचं स्वागत केलं.

रुपाली चाकणकर यांनीही धरला ठेका

गडचिरोलीतील महिलांनी पारंपारिक पद्धतीनं नृत्य करत स्वागत केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी देखील त्यांच्यामध्ये सहभाग घेतला. रुपाली चाकणकरांनी आदिवासी महिलांसोबत नृत्यामध्ये सहभागी होत ठेका धरला. थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सहभागी झाल्यानं आदिवासी महिलांचा आनंद द्विगुणित झाला होता.

संस्कृती मनाला भावणारी

रुपाली चाकणकर यांनी गडचिरोलीतील आदिवासी संस्कृती मनाला भावणारी असल्याचं वक्तव्य केलं आहे.

गडचिरोलीत महिला आयोग आपल्या दारी उपक्रम

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी शुक्रवारी गडचिरोली येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘जनसुनावणी’ घेण्यात आली याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या जनसुनावणी यावेळी तब्बल 100 पेक्षा जास्त केसेस आल्या होत्या. कौटुंबिक हिंसाचार, कोरोना मध्ये विधवा झालेल्या महिलांच्या आर्थिक प्रश्नांबाबत च्या प्रकरणातील केसेसची संख्या जास्त होती. या सर्वांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तीन पॅनेल नियुक्त केले होते. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे या जनसुनावणी मध्ये घटस्फोट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही पती-पत्नी जोडप्यांमधील वाद सामंजस्याने मिटवून त्यांच्यामध्ये समझोता देखील करण्यात आला.

इतर बातम्या:

लेकरांना क्रिकेटर करायचंय? अंडर-19 एशिया कपच्या कप्तानाची ही बातमी तुम्हाला प्रेरणा देईल

Video: देश शोकसागरात, भाजप आयटी सेलकडून प्रियंका गांधींच्या ‘डान्स’चा व्हिडीओ ट्विट, काँग्रेसचेही जशास तसे उत्तर

Rupali Chakankar dance on Tribal Tradition at Gadchiroli video viral on social media

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें