AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरचा आणखी एक तारा निखळला, उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं निधन, महिनाभरात घरात तिसरा मृत्यू

Sangameshwar Bomane : संगमेश्वर बोमणे हे उद्योजक होते. त्यांच्या संगम हायटेक नर्सरीचं मोठं जाळ आहे. ऑल इंडिया नर्सरीमेन असोसिएनशनचे संचालक तसच लातूर रोटरी क्लबचे ते सचिवही होते.

लातूरचा आणखी एक तारा निखळला, उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं निधन, महिनाभरात घरात तिसरा मृत्यू
Sangameshwar Bomane
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 11:19 AM
Share

लातूर :  लातूर ही अनेक रत्नांची खाण आहे. या शहरात सामाजिक, सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. उद्योग जगतातही लातूरकरांचं नाव मोठं आहे. त्या चळवळीतलंच एक मोठं नाव म्हणजे संगमेश्वर बोमणे (Sangameshwar Bomane). त्यांचं मुंबईत निधन झालं. ते फक्त 36 वर्षांचे होते. विशेष म्हणजे बोमणे यांच्या आई वडिलांचं निधनही महिन्याभरापूर्वीच झालं आहे. त्यामुळेच लातूरच्या विकासात हातभार लावणाऱ्या घरात महिन्याभरात तीन मृत्यू ओढावलेत. कोरोनानं फक्त एका कुटुंबातल्याच कर्त्याधर्त्याला हिरावलं असं नाही तर एका शहराच्या जडणघडीत वाटा उचलणाऱ्या कुटुंबावर कोरोनाची वक्रदृष्टी पडली आहे. (Sangameshwar Bomane young entrepreneur from latur passes away in Mumbai IAS G Sreekanth Maharashtra minister Amith Deshmukh expressed condolences)

कोण होते संगमेश्वर बोमणे?

संगमेश्वर बोमणे हे उद्योजक होते. त्यांच्या संगम हायटेक नर्सरीचं मोठं जाळ आहे. ऑल इंडिया नर्सरीमेन असोसिएनशनचे संचालक तसच लातुर रोटरी क्लबचे ते सचिवही होते. सव्वा महिन्यापासून मुंबईतल्या सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रचंड कष्टाळू, प्रतिकुल परिस्थितीतून विश्व निर्माण करणारे, मितभाषी, अतिशय नम्र म्हणूनच संगमेश्वर बोमणे यांची लातूरकरांना ओळख आहे.

नर्सरीचा उद्योगही त्यांनी याच गुणांवर विकसित केला. असंख्या कुशल, अकुळ कामगारांना त्यातून रोजगार मिळाला. वनश्री मित्र मंडळाचे सदस्य, लातूर वृक्ष चळवळीचे कोअर कमिटी सदस्य, लातूर डेअरी फार्मचे चेअरमन अशा विविध संस्थांशी तो जोडले गेलेले होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, शिवरत्न पुरस्कार, दीपस्तंभ पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं.

आणि बोमणेंनी परिसर फुलवले 

तुम्ही लातुरच्या मांजरा साखर कारखाना परिसरात गेलात तर तिथलं उद्यान, दयानंद संस्थेच्या क्रिकेट स्टेडियमवरची हिरवळ हे सगळं संगमेश्वर बोरणेंच काम आहे. एवढच नाही तर मराठवाड्यातली पहिली ऊस रोप नर्सरी, पहिली ट्री अँब्युलन्सही त्यांनीच सुरु केली.

महिन्याभरापूर्वी आई वडीलांचं निधन

कोरोनानं बोमणे कुटुंबावर मोठं संकट आलं. महिन्याभरापुर्वीच संगमेश्वर बोमणे यांचे वडील महालिंगप्पा आणि आई मुद्रिकाबाई यांचं निधन झालं. त्यानं संगमेश्वर यांनाही कोरोनाने गाठले. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत चढउतार पहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वीच ते पूर्ण बरे होऊन लातूरला येणार अशी चर्चा होती पण कोविडनंतरच्या परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. संगमेश्वर यांच्या मागे पत्नी पुजा, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ, बहिण, भावजय असं मोठं कुटुंब आहे. संगमेश्वर यांच्या पार्थिवावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगमेश्वर बोमणे यांच्यावरील व्हायरल पोस्ट

संगमेश्वर बोमणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कर्तृत्वाबाबत एक पोस्ट व्हायरल होते आहे, त्यातला काही मजकूर असा- शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्ती मी डोळ्यासमोर पाहिला, ऑफिसबॉय, माळी म्हणून काम करणारा मुलगा मराठवाडा तील सर्वात मोठ्या नर्सरीचा मालक झाला. अफाट कष्ट घेतले, 20 वर्षात गगन भरारी घेतली, हजारो हाताना काम दिले, लातुर परिसरात वन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वात मोठा हातभार संगमेश्वर याचा आहे. अत्यंत कमी किमतीत हवी ती रोपे हव्या त्या संख्येत रोपे लातूर सारख्या दुष्काळी भागात उपलब्ध करून दिली. गार्डन मेंटननन्स ही नवीन सुविधा उपलब्ध करून देऊन घरोघरी प्रशिक्षित माळी पाठवून जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत गच्चीवरील बागा, परसबाग तयार करून दिल्या.

अमित देशमुख यांची श्रद्धांजली 

मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, संगम हायटेक नर्सरीची अगदी शून्यातून सुरूवात करून, तिला नावारूपाला आणणारे संगमेश्वर बोमणे यांचे वृक्ष चळवळीतील योगदानही मोठे आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे संगमेश्वर यांचे वडील महालिंगअप्पा आणि आई मुद्रिकाबाई या दोघांचेही निधन झाले होते. आता संगमेश्वर यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. त्यामुळे बोमणे कुटुंबीयावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लातूर येथील एक होतकरू तरूण उद्योजक आणि लातूर येथील हरीत चळवळ वाढवण्याच्या योगदानामुळे त्यांच्याशी माझा वैयक्तिक पातळीवरही जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मित जाण्याने आपले वैयक्तिक आणि लातूरच्या वृक्ष चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माझी भावना आहे. बोमणे कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी ही प्रार्थना करीत आहे.

IAS जी श्रीकांत हळहळले 

दरम्यान, संगमेश्वर बोमणे यांच्या निधनाने IAS जी श्रीकांत हे सुद्धा हळहळले. संगमेश्वर बोमणे यांचं निधन वेदनादायी असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

संबंधित बातम्या 

वृद्ध महिलेची सून आणि नातवाकडून हत्या, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला

Weather Update: लोणावळ्यात मुसळधार पावसाची बँटिंग, सागंली लातूरसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

(Sangameshwar Bomane young entrepreneur from latur passes away in Mumbai IAS G Sreekanth Maharashtra minister Amith Deshmukh expressed condolences)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...