सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व नव्हे, तरुणांनी राजकारणात यावं, 80 चं दशक गाजवणाऱ्या विद्यार्थी नेत्यांची तरुणाईला साद

80 च्या दशकातील पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापिताच्या विरोधात बंड करणारे विद्यार्थी संघटनाचे माजी विद्यार्थी नेते तब्बल 42 वर्षांनी विठ्ठलकाका पाटील यांच्या संकल्पनेतून एकत्र आले होते.

सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व नव्हे, तरुणांनी राजकारणात यावं, 80 चं दशक गाजवणाऱ्या विद्यार्थी नेत्यांची तरुणाईला साद
सांगली माजी विद्यार्थी नेत्यांची बैठक

सांगली: सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व नाही तरुणांनी राजकारणात यावे आणि स्वतः च्या पायावर उभे राहावे यावे, यासाठी एकेकाळी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून मैदान गाजवणारी मंडळी एकत्र आली होती. 80 च्या दशकातील पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणारे विद्यार्थी संघटनाचे माजी विद्यार्थी नेते तब्बल 42 वर्षांनी विठ्ठलकाका पाटील यांच्या संकल्पनेतून एकत्र आले होते.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात 80 च्या दशकात विध्यार्थी चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात बंड करून आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे त्यावेळेचे सर्वसामान्य कुटुंबातील सर्व माजी विद्यार्थी संघटनेचे नेते काल पुन्हा तब्बल 42 वर्षांनी एकत्र आले होते.

विद्यार्थ्यांनी राजकारणात यावं

आजकाल अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीच्या मागे लागले आहेत. नोकरी नाही मिळाली की आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळवण्यासाठी अनेक मुले आपले सर्वस्व पणाला लावून अभ्यास करत आहेत. पास झालो तर सरकारी नोकरी करायची आणि नापास झालो तर आत्महत्या करत आहेत, असं चित्र सध्या दिसतं. मात्र, हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी राजकारणात आले पाहिजे. संघर्ष करून स्वतः च्या पायावर उभे राहिले पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि 1980 च्या दशकातील माजी विद्यार्थी संघटनेचे नेते विठ्ठल पाटील यांनी 80 च्या दशकातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांना एकत्र बोलावून बैठक घेतली आहे.

सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथून अनेक माजी विद्यार्थी नेते बऱ्याच वर्षांनी सोमवारी एकत्र आले होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत आपण आज ही समाजासाठी काही तरी केले पाहिजे. नोकरी न मिळाल्यानं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवले पाहिजे यासाठी चर्चा करण्यात आली.

इतर बातम्या:

PM KISAN : 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांचा सन्मान, योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!

Nashik Corona: कोरोनाला चित करण्याचा निर्धार; 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसवले 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Sangli ex student leaders appeal students to came into politics

Published On - 7:18 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI