AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM KISAN : 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांचा सन्मान, योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!

देशभरातील 10 कोटी 50 लाख 72 हजार 528 शेतकऱ्यांच्या खत्यावर 2 हजाराप्रमाणे पैसे जमा झाले आहेत. जर शेतकऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असेल आणि इतर शेतकरीही योजनेसाठी पात्र असतील तर आशा 65 लाखहून अधिक शेतकऱ्यांना अजूनही ही रक्कम मिळू शकते.

PM KISAN : 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांचा सन्मान, योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!
पीएम किसान योजना
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 7:05 AM
Share

मुंबई : (P. M. Kisan Sanman Yojna) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता (Farmer) शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा करुन 10 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत देशभरातील 10 कोटी 50 लाख 72 हजार 528 शेतकऱ्यांच्या खत्यावर 2 हजाराप्रमाणे पैसे जमा झाले आहेत. जर शेतकऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असेल आणि इतर शेतकरीही योजनेसाठी पात्र असतील तर आशा 65 लाखहून अधिक शेतकऱ्यांना अजूनही ही रक्कम मिळू शकते.

याकरिता कुण्या अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही किंवा कुण्या कार्यालयातील अर्जाची गरज नाही. शेतकरी स्वत: अर्ज करु शकणार आहे. योजनेसाठी पात्र आहेत पण 10 हप्ताच मिळाला नाही त्यांना एक अर्ज करुन 31 मार्च पर्यंत रखडलेला हप्ता मिळवता येणार आहे. या योजनेकरीता देशातील 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील पात्र नसतानाही लाभ घेणारे वगळण्यात आले आहेत पण पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

असा करा अर्ज…

पंतप्रधान-किसान पोर्टलला (https://pmkisan.gov.in/) भेट देऊन तुम्ही स्वत:ला अर्ज करू शकता. यासाठी येथे एका अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही. याचा अणखीन एक असा फायदा आहे की, तुम्ही स्वत: नोंदणी केली की तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील सहज मिळू शकते. ज्यामध्ये 3 लाख रुपयांचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने मिळणार आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटवरही हा फॉर्म उपलब्ध आहे. प्रथम आपल्याला या योजनेशी संबंधित (https://pmkisan.gov.in/) अधिकृत साइटला भेट देणे आवश्यक आहे. मग उजवीकडे तुम्हाला FARMER CORNERS पर्याय दिसेल. त्यावर नवीन FARMER CORNERS क्लिक करा. त्यानंतर नविन पान ओपन होईल ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण शेतकऱ्यांचा पर्याय असेल. यामध्ये तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडून फॉर्म भरायचा आहे.

या महत्वाच्या नोंदी कराव्याच लागणार आहेत

वैयक्तिक माहिती भरताना आधार क्रमांक, मोबाइल नंबर, राज्य नाव टाकावे लागणार आहे. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी आणि त्यानंतर captcha कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल यामध्ये राज्ये, जिल्हे, तहसील, ब्लॉक आणि गावे भरावी लागतील. लिंग व श्रेणी, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पत्ता, आई, वडील किंवा पती यांचे नाव, जमीन नोंदणी ओळखपत्र, रेशन कार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि जमीन रेकॉर्ड भरून ते बरोबर आहे का ते पहावे लागणार आहे. याशिवाय सांगतील ते काही पेपर अपलोड करणे देखील आवश्यक आहे.

आतापर्यंत 1 लाख 81 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

देशभरातील शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी औपचारिकरित्या सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना 1 लाख 81 हजार कोटी रुपयांची विक्रमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. या अंतर्गत सरकारने सर्व 14 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना पैसे देण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण 36 महिन्यांत हे लक्ष्य साध्य होऊ शकले नाही.

संबंधित बातम्या :

Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.