AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Crime : सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

बिरणगे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलिस करीत आहेत. सांगली विश्रामबाग पोलीस लाईन येथे ते कुटुंबासोबत राहत होते. बिरणगे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. बिरणगे यांची पत्नी गृहिणी आहे तर दोन्ही मुलं महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

Sangli Crime : सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
सांगलीत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 3:49 PM
Share

सांगली : अज्ञात कारणावरुन एका पोलीस हवालदारा (Police Constable)ने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज सकाळी सांगलीत घडली आहे. रामचंद्र बिरणगे (46) असं पोलिस हवालदाराचे नाव आहे. रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. बिरणगे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलिस करीत आहेत. सांगली विश्रामबाग पोलीस लाईन येथे ते कुटुंबासोबत राहत होते. बिरणगे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. बिरणगे यांची पत्नी गृहिणी आहे तर दोन्ही मुलं महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Sangli police constable committed suicide by strangulation for unknown reasons)

चार दिवसांपूर्वी बिरणगे यांच्या घरी चोरीही झाली

चार दिवसापूर्वी बिरणगे यांच्या घरी चोरी झाली होती. याबाबत बिरणगे यांच्या पत्नी आरती बिरणगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरती यांनी या चोरी प्रकरणी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. (Sangli police constable committed suicide by strangulation for unknown reasons)

इतर बातम्या

Madhya Pradesh: पत्रकारासह आठ जणांची पोलीस ठाण्यात अर्ध नग्न परेड, मध्यप्रदेश पोलिसांवर छळवणुकीचा आरोप; काय आहे प्रकरण?

UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.