साताऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक, शशिकांत शिंदेंचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक झाली आहे Satara NCP and Congress office

साताऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक, शशिकांत शिंदेंचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 2:56 PM

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. (Satara some people throw stones on NCP and Congress office Shashikant leaders accused on BJP party workers)

शशिकांत शिंदे यांनी दगडफेकीचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची परिस्थिती असताना काहीजण महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना तीव्र झाल्या. कोर्टानं घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हात जोडून निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप

भाजपची काही मंडळी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रकार सातारामध्ये झाला. साताऱ्यात काही व्यक्ती आल्या त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राज्यमंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली. ही नावं पोलिसांना कळालेली आहेत. त्या व्यक्ती कोणत्या पक्षाचं काम करतात, कोणत्या संघाचं काम करतात, कोणत्या आमदाराचं काम करतात हे सुद्धा कळलेलं आहे. माझी पोलिसांनी आरोपींना 24 तासात अटक करावी, ही विनंती आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. खालच्या पातळीवर राजकारण केलं जातेय हे दुर्दैव आहे.

राष्ट्रवादी मराठा बांधवांच्या पाठिशी

मराठी बांधवाच्या पाठिशी होतो, आहोत यापुढेही राहणार आहोत. मराठा समाज जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहू, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. भाजपच्या मंडळींना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा वाटत असेत तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे ताकद लावा आणि कायदा करा, आम्ही तुमचं स्वागत करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

मराठा बांधवांच्या नावावर राजकारण करणं थांबवा. ज्या तरुणांनी हे केलं त्यांच्यावर केसेस होतील. ज्यांनी हे केलं त्यांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. पण आज मराठा बांधवांच्या भावना तीव्र आहेत, त्याच्याशी सहमत आहोत. पोलिसांनी या प्रकरणी कोण आहेत त्यांची नावं जाहीर करावीत, म्हणजे यामागे कोण आहेत हे समजेल, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

सातारा पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरु केला आहे. सातारा शहर पोलीस याबाबत तपास करत आहेत.

संबंधित बातम्या:

काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारा शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री, कोण आहेत संजय राठोड?

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

(Satara some people throw stones on NCP and Congress office Shashikant Shinde accused on BJP party workers)

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.