AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एण्ट्री, भाजप नगरसेवकांच्या मनगटावर शिवबंधन बांधणार?

सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. | Sanjay Raut

एकनाथ खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एण्ट्री, भाजप नगरसेवकांच्या मनगटावर शिवबंधन बांधणार?
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 12, 2021 | 10:32 AM
Share

जळगाव: शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Shivsena MP Sanjay Raut will hold party meeting in Jalgaon)

दरम्यान, या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

नगरसेवकांच्या बैठकीनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर आदींसह पदाधिकारी उपस्थित असतील.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

मुक्ताईनगरमधील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश

दरम्यान, मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहा आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं.

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी, आता संजय राऊतंचं उत्तर

जळगावात भाजपला हादरे सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तीन नगरसेवक शिवसेनेत

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

(Shivsena MP Sanjay Raut will hold party meeting in Jalgaon)

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत