जळगावात भाजपला हादरे सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तीन नगरसेवक शिवसेनेत

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. (Jalgaon BJP Corporators join Shivsena)

जळगावात भाजपला हादरे सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तीन नगरसेवक शिवसेनेत
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांचा सेनाप्रवेश
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 7:27 AM

मुंबई/जळगाव : जळगाव महापालिकेतील भाजपला गळती सुरुच असल्याचं दिसत आहे. भाजपच्या आणखी तीन नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील दहा आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरातच भाजपला आणखी एक धक्का मिळाला आहे. (Jalgaon Municipal Corporation Three BJP Corporators join Shivsena in presence of CM Uddhav Thackeray)

जळगाव महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. यापूर्वी 27 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शनिवारी आणखी तिघांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला. भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट शिवसेनेत गेल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा सेनाप्रवेश झाला.

जळगाव भाजपमधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणारे नगरसेवक

सुरेश सोनवणे शोभाताई बारी शेख हसीना बी शेख शरीफ

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

मुक्ताईनगरमधील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश

दरम्यान, मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहा आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं.

एकनाथ खडसेंचं म्हणणं काय?

एकनाथ खडसे यांनी याबाबत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी घडवून आणलेल्या या भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रवेशाचं खंडन केलं आहे. “मुक्ताईनगरमध्ये भाजपचे 10 नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अपात्रतेच्या भीतीपोटी पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेत गेल्याचं दिसतंय. बाकीचे नगरसेवक हे माझे समर्थक आहेत. त्यामुळे नगरपंचायतीवर कुठलाही परिणाम याचा होणार नाही” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. (Jalgaon BJP Corporators join Shivsena)

मुक्ताईनगर नगरपंचायतीचं गणित काय सांगतं?

मुक्ताईनगर नगरपंचायतीत एकूण नगरसेवकांची संख्या 17 आहे. त्यापैकी भाजपाचे 13 नगरसेवक विजयी झाले होते, तर 1 अपक्ष धरुन भाजपची संख्या 14 होती. शिवसेनेचे या ठिकाणी 3 नगरसेवक होते. भाजपचा लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे. एका अपात्र नगरसेवकासह सहा नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे 14 पैकी 8 नगरसेवक हे आजही भाजपच्या गटात आहेत. तर शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्याही 8 झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांची सध्याची परिस्थिती शिवसेनेचे 8 आणि भाजपचे 8 अशी असून या ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचा आहे.

नगराध्यक्ष भाजपचे असल्यामुळे आजही या ठिकाणी भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र खरं तर हा मुक्ताईनगरच्या इतिहासात भाजपला बसलेला मोठा धक्काच आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुक्ताईनगर भाजपला मोठा धक्काच बसल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या 

मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नक्की धक्का कोणाला? खडसेंच्या वक्तव्याने खळबळ

मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये

(Jalgaon Municipal Corporation Three BJP Corporators join Shivsena in presence of CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.