Breaking : मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवे केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलंय.

Breaking : मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मुक्ताईनगरमधील भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव भाजपला बसणारी धक्क्याची मालिका सुरुच आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिलाय. मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवे केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलंय. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का मानला जातोय. (10 BJP corporators In Muktainagar joined ShivSena in the presence of CM Uddhav Thackeray)

एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची प्रक्रिया राबवल्याचं पाहायला मिळत आहे.

Muktainagar Shivsena Pravesh

मुक्ताईनगरमधील भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

भुसावळमध्येही भाजपला मोठा झटका

जळगाव जिल्ह्यात भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला गेला. सावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, 14 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडलाय.

संबंधित बातम्या :

खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

10 BJP corporators In Muktainagar joined ShivSena in the presence of CM Uddhav Thackeray

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI