मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नक्की धक्का कोणाला? खडसेंच्या वक्तव्याने खळबळ

एकनाथ खडसे यांनी याबाबत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी घडवून आणलेल्या या भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रवेशाचं खंडन केलं आहे. (Muktainagar BJP corporators Eknath Khadse )

मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नक्की धक्का कोणाला? खडसेंच्या वक्तव्याने खळबळ
एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 3:47 PM

मुंबई/मुक्ताईनग : मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे 10 नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणतात. तर हा धक्का नक्की कोणाला आहे, हे लवकरच समजेल, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुरेश भोळे यांनी एकनाथ खडसे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. (Jalgaon Muktainagar Nagar Panchayat BJP corporators joined Shivsena Eknath Khadse reacts know the Political equation)

गुलाबराव पाटील काय म्हणतात?

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना “हा एकनाथ खडसे यांना धक्का बसला का?” असे विचारल्यावर हा धक्का भाजपला असून एकनाथ खडसे यांना याबाबत आनंदच होईल. कारण शिवसेनेत पक्षप्रवेश करणारे मुक्ताईनगरचे नगरसेवक भाजपचे होते, असं म्हटलं.

एकनाथ खडसेंचं म्हणणं काय?

एकनाथ खडसे यांनी याबाबत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी घडवून आणलेल्या या भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रवेशाचं खंडन केलं आहे. “मुक्ताईनगरमध्ये भाजपचे 10 नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अपात्रतेच्या भीतीपोटी पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेत गेल्याचं दिसतंय. बाकीचे नगरसेवक हे माझे समर्थक आहेत. त्यामुळे नगरपंचायतीवर कुठलाही परिणाम याचा होणार नाही” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

भाजपचे उरलेले 8 नगरसेवक खडसेंच्या निवासस्थानी

भाजपचे उरलेले 8 नगरसेवक काल एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी तात्काळ गेले होते. खडसे भाजपमध्ये असताना एकंदरीत नगरपंचायतीवर खडसेंच्या माध्यमातून भाजपचा झेंडा फडकला होता. आजही खडसे राष्ट्रवादीत असले तरीही भाजपचे नगरसेवक हे खडसे समर्थक असल्याचे सांगतात.

मुक्ताईनगर नगरपंचायतीचं गणित काय सांगतं?

मुक्ताईनगर नगरपंचायतीत एकूण नगरसेवकांची संख्या 17 आहे. त्यापैकी भाजपाचे 13 नगरसेवक विजयी झाले होते, तर 1 अपक्ष धरुन भाजपची संख्या 14 होती. शिवसेनेचे या ठिकाणी 3 नगरसेवक होते. भाजपचा लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे. एका अपात्र नगरसेवकासह सहा नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे 14 पैकी 8 नगरसेवक हे आजही भाजपच्या गटात आहेत. तर शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्याही 8 झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांची सध्याची परिस्थिती शिवसेनेचे 8 आणि भाजपचे 8 अशी असून या ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचा आहे.

नगराध्यक्ष भाजपचे असल्यामुळे आजही या ठिकाणी भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र खरं तर हा मुक्ताईनगरच्या इतिहासात भाजपला बसलेला मोठा धक्काच आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुक्ताईनगर भाजपला मोठा धक्काच बसल्याचे मानले जात आहे.

मुक्ताईनगरच्या शिवसेना आमदाराचा मानस काय?

मुक्ताईनगर नगरपंचायतमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक संपर्कात आहेत. या नगरसेवकांच्या माध्यमातून मुक्ताईनगरचा विकास कसा साधला जाईल, ते भविष्यात कळेलच. तसेच शिवसेनेचा उपनगराध्यक्ष करण्याची आमची मानसिकता आहे. तो आम्ही लवकरच करु, अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे काय म्हणतात?

मुक्ताईनगर पंचायतीचे विद्यमान सात नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवक हे सेनेत गेल्याची माहिती मला माध्यामातूनाच कळली आहे. या संदर्भात मी माहिती घेत आहे, या घटनेचा धक्का नक्की कोणाला याचा मीडिया नक्की तपास काढेल, तीन वर्षांपूर्वी ही निवडणूक झाली होती. हा भाजपाला धक्का अस सांगितलं जातं असलं तरी जे मूळ भाजपाचे आहेत ते भाजपमध्येच राहणार आहेत. इकडे तिकडे जाणाऱ्यांची कधीही पक्षावर निष्ठा नसते, मीडिया हुशार आहे, हा धक्का कोणाला, हे त्यांना चांगलं माहित आहे, असं सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुरेश भोळे यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता टोला लगावला.

संबंधित बातम्या 

मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये

(Jalgaon Muktainagar Nagar Panchayat BJP corporators joined Shivsena Eknath Khadse reacts know the Political equation)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.