AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या एसटीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले, मग डॉक्टरसोबत जे घडले भयंकर !

मुदखेडहून नांदेडला एसटी चालली होती. सीता नदीवरील पुलावर एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले. यानंतर मोठा अनर्थ घडला.

धावत्या एसटीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले, मग डॉक्टरसोबत जे घडले भयंकर !
नांदेडमध्ये एसटीची कारला धडकImage Credit source: TV9
| Updated on: Mar 15, 2023 | 6:36 PM
Share

नांदेड / राजीव गिरी : नांदेडमध्ये नादुरुस्त एसटी बसेसमुळे अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशीच एक घटना आज सकाळी घडली. धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. मुदखेड नांदेड रस्त्यावर सीता नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या धडकेत कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. मुदखेड येथील डॉ. अमोल सरसे हे गंभीर जखमी झाले. सरसे यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय.

डॉ. सुरवसे हे मुदखेडमध्ये खाजगी रुग्णालय चालवतात. कारने ते नांदेडहून मुदखेडकडे जात असताना बसच्या धडकेत जखमी झाले. मुदखेड शहरात ते रुग्णसेवा हॉस्पिटल नावाचे खाजगी रुग्णालय चालवतात.

मुदखेडहून नांदेडला चालली होती बस

महाराष्ट्र राज्य परिवहनाची बस आज सकाळी मुदखेडहून नांदेडला चालली होती. नांदेड येथील सीता नदीच्या पुलावर येताच एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले. यामुळे एसटी कारला धडकली. या धडकेत कारमध्ये प्रवास करणारे मुदखेडचे डॉ. अमोल सरसे हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित नांदेडला पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

नादुरुस्त एसटीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ

नांदेड मुदखेड उमरी या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस ह्या कायमस्वरूपी नादुरुस्त असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच असे अपघात घडतात. त्यामुळे या भागातील नागरिक एसटी बस ऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.

नंदुरबारमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात

रस्त्यावरील खड्डे चुकवताना पोलिसांच्या वाहनाची ट्रकला धडक बसून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज सकाळी नंदुरबारमध्ये घडली. जखमींमध्ये पोलीस निरीक्षकाचा समावेश असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.