ड्युटीवरुन घरी परतत होते, पण रस्त्यावरील खड्डे चुकवायला गेले अन्…

नेत्रंग-शेवाळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ड्युटीवरुन घरी परतत होते, पण रस्त्यावरील खड्डे चुकवायला गेले अन्...
नंदुरबारमध्ये पोलीस वाहन आणि ट्रकमध्ये अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 6:40 PM

नंदुरबार / जितेंद्र बैसाणे : रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घनटा नंदुरबारमध्ये सकाळी घडली. नेत्रंग-शेवाळी महामार्गावर सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ पोलीस गाडी आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महामार्गावर खड्ड्यांच्या साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथे नेहमी अपघाताच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता महामार्ग प्रशासनाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरावे अशी मागणी नागरिकांसोबतच पोलीस दलातील अधिकारी करू लागले आहेत.

ड्युटीवरुन घरी परतताना अपघात

पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार आणि मुख्यालयातील कर्मचारी रात्रीच्या गस्तीसाठी तळोदा परिसरात गेले होते. तिथून परत येताना पहाटे त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते. या महामार्गावर दिवसागणित अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

अपघात निरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमी

पोलीस गाडी तळोदाकडून नंदुरबारच्या दिशेने येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. या अपघातात पोलीस निरीक्षक भावसार यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावसार यांना गंभीर दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नांदेडमध्ये एसटी कारला धडक

एसटीने कारला धडक दिल्याने अपघातात कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. जखमी डॉक्टरवर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.