AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंधळात गोंधळ, पोलीस भरती प्रवेशाचे सर्व्हर डाऊन; इच्छुकांची तारांबळ, धावपळ आणि संताप

आज ना उद्या पोलीस भरती होईल आणि आपल्याही अंगावर वर्दी येईल या अपेक्षेने हजारो विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असतात. त्यासाठी महिनो न महिने सराव करतात.

गोंधळात गोंधळ, पोलीस भरती प्रवेशाचे सर्व्हर डाऊन; इच्छुकांची तारांबळ, धावपळ आणि संताप
गोंधळात गोंधळ, पोलीस भरती प्रवेशाचे सर्व्हर डाऊन; इच्छुकांची तारांबळ, धावपळ आणि संताप Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2022 | 10:50 AM
Share

नगर : राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होणार आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी ही पोलीस भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रवेशही सुरू झाले आहेत. मात्र, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गेलेल्या इच्छुकांना भलत्याच संतापाला सामोरे जावं लागत आहे. पोलीस भरतीसाठीचं संकेतस्थळच ओपन होत नसल्याने इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन दाखवत असल्याने इच्छुक उमेदवार इतर सायबर कॅफेत जाऊन तिथेही संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तिथेही सर्व्हर डाऊन दाखवले जात आहे. त्यामुळे या भावी पोलिसांची चांगलीच दमछाक होत असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.

10 नोव्हेंबरपासून राज्यात पोलीस भरतीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने संकेत स्थळावर माहिती भरण्याचं आवाहनही केलं आहे. त्यामुळे पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेक तरुणांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

पण हा अर्ज भरण्यासाठी गेले असता संकेत स्थळच उघडत नसल्याचं उमेदवारांच्या लक्षात आलं. त्यानंतर या उमेदवारांनी दुसऱ्या सायबर कॅफेत जाऊनही प्रयत्न केला. पण तिथेही सर्व्हर डाऊन असल्याचं दाखवत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उमदेवारी अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांची सायबर कॅफेमध्ये जोर झुंबड उडत आहे. नगर, सोलापूर, औरंगाबाद आणि गडचिरोलीसह सर्वच जिल्ह्यात हे चित्रं दिसत आहे. आज ना उद्या संकेतस्थळ सुरू होईल आणि अर्ज करता येईल या आशवेर गेल्या 18 दिवसांपासून हे तरुण सायबर कॅफेत येत आहेत. सर्व कामधंदा सोडून सायबर कॅफेत आल्यानंतर हाती निराशा येत असल्याने या तरुणांचा संताप अनावर झाला आहे.

आज ना उद्या पोलीस भरती होईल आणि आपल्याही अंगावर वर्दी येईल या अपेक्षेने हजारो विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असतात. त्यासाठी महिनो न महिने सराव करतात. मात्र यंदाच्या भरती प्रक्रियेत अनेक बाबींची स्पष्टता नसल्याने भविष्यात ही प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती मंगळवेढा येथील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्रीकांत पवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्यभरातून लाखो इच्छुक विद्यार्थी या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल करत आहेत. पण ज्या संकेतस्थळावरून हे अर्ज भरले जात आहेत. तेथील सर्व्हर डाऊन असल्याचा अनुभव वारंवार या विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे आणखी 15 दिवसांचा वेळ अर्ज भरण्यासाठी वाढवून द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकारने पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही तर यांची संधी तर हुकेल आणि भविष्यात हे सर्व न्यायालयीन प्रक्रियेत अडकेल अशी भीती आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी जेमतेम तीन दिवसांचा अवधी उरला असतानाचा सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना दिवदिवस सायबर कॅफेसमोर उभे राहावे लागत आहे. मंगळवेढा व पंढरपूर परिसरातील अनेक कॅफे समोर अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.