रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार, स्थलांतरावरुन राजकारण होत असल्यास हाणून पाडू, उदय सामंतांची माहिती

नांदेडमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी आहे, तशी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय.

रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार, स्थलांतरावरुन राजकारण होत असल्यास हाणून पाडू, उदय सामंतांची माहिती
उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

नांदेड: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज नांदेड दौऱ्यावर आहेत. उदय सामंत यांनी यावेळी बोलताना नांदेड जिल्ह्यातील प्रशासनानं महाविद्यालय सुरु करण्यासदर्भात निर्णय घ्यावा, असं म्हटलं. तर, पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरवरही त्यांनी भाष्य केलं. शनिवारी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचं, उदय सामंत यांनी सांगितलं.

नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

नांदेडमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी आहे, तशी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. नांदेडमध्ये कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यामुळे किती क्षमतेने कॉलेज सुरू करायचे याचा निर्णय प्रशासनाला घ्यायचा आहे. जर प्रशासनाचा प्रस्ताव योग्य आला तर कॉलेज सुरू होतील असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलंय.

रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला एक इतिहास आहे. इन्स्टिट्यूट हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. अनेक संघटनांनी ही हा प्रश्न उचलला आहे. त्यामुळे मी ही 14 तारखेला रानडेला इन्स्टिट्यूट भेट देणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.स्थलांतरावरुन तिथे काही राजकारण होत असेल तर आपण तो हाणून पाडू असे मत ही सामंत यांनी व्यक्त केलय. सामंत आज नांदेडमध्ये बोलत होते.

“रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये”

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रिका विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठ आवारातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलिन करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. याला युक्रांदचा विरोध आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये. विद्यापीठ वारंवार वादाचे निर्णय जाणीवपूर्वक घेत असल्याचेच यावर दिसत आहे,” असं मत युक्रांदचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी व्यक्त केलं.

“दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नाही”

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वाद झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नसल्याचं त्यांनी सांगितलं. रानडेमधील वृत्तपत्रविद्या विभागाला विद्यापीठात जागा दिली जाईल. तेथे त्यांना हवे ते अभ्यासक्रम चालवता येतील. रानडेत डागडुजी आणि नुतनीकरण करणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेत आहोत.”

इतर बातम्या:

पुण्यातील ‘रानडे इन्स्टिट्यूट’च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव, नेमकं कारण काय?

पुण्यात महाविकासआघाडीचा भाजपला ‘दे धक्का’, महानगरपालिका निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार?

Uday Samant said he will visit Ranade Institute on Saturday during Nanded tour

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI