पुणे : पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध होतोय. विद्यापीठाने रानडेतील पत्रकारितेचा विभाग आणि विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडी यांचं विलिनीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवलाय. मात्र, यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या ओळखीला धक्का लागेल, असं मत व्यक्त होत आहे.