मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता.

मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?
अजित पवार

पुणे : पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. (Great relief to the traders, hoteliers and common citizens of Pune)

पुण्यात निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार आता पुण्यात

>> सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
>> हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
>> शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
>> मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश

 

अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. काही लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातही शिथिलता देण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?

आधी कोरोनाचा मार, आता यवतमाळमध्ये ‘या’ रोगांचा पिकांवर हल्ला, शेतकरी हवालदील

Great relief to the traders, hoteliers and common citizens of Pune

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI