पुण्यात उद्यापासून मॉल सुरू होणार पण तुम्हाला प्रवेश मिळणार का? वाचा काय आहे नियम?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठी घोषणा केली. पुण्यात आता दुकानांपाठोपाठ मॉलही उघडण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

पुण्यात उद्यापासून मॉल सुरू होणार पण तुम्हाला प्रवेश मिळणार का? वाचा काय आहे नियम?
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 5:14 PM

पुणेः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून, हळूहळू सगळंच अनलॉक होण्यास सुरुवात झालीय. पुण्यातही कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठी घोषणा केली. पुण्यात आता दुकानांपाठोपाठ मॉलही उघडण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

? पुण्यातील मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार

पुण्याच्या महापौरांनी मॉल सर्वसामान्यांसाठी उघडत असल्याची घोषणा केलीय. परंतु मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी काही अटी आणि शर्थीही टाकल्यात. पुण्यातील मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार असून, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्यांना कोरोनाचे नियमही पाळावे लागणार आहेत. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, हात सॅनिटाईज करणे अशा गोष्टींचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे पुणे उद्यापासून जवळपास अनलॉक झाल्याची चर्चा आहे.

? पुण्यात आता नेमकं काय सुरू राहणार?

? सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार ? हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार ?शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी ? मॉल रात्री 8 पर्यंत सुरू ठेवता येणार, पण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार

? अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

? ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. काही लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातही शिथिलता देण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?

आधी कोरोनाचा मार, आता यवतमाळमध्ये ‘या’ रोगांचा पिकांवर हल्ला, शेतकरी हवालदील

maharashtra pune unlock mall in Pune will start from tomorrow but will you get entry? Read What is the rule?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.