“उद्धवा, अडीच वर्षात कोकणाला काय दिलं?;” नारायण राणे यांचा सवाल

केंद्रात कुणालाही फोन केला. तरी ते मंत्री मला एस सर म्हणतात. मी सांगितलेलं काम करतात, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

उद्धवा, अडीच वर्षात कोकणाला काय दिलं?; नारायण राणे यांचा सवाल
नारायण राणे
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 9:41 PM

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) देशाला महासत्तेकडं घेऊन चाललेत, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला. आंगणेवाडी येथील सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री बोलायला आवडत नसल्याचंही नारायण राणे म्हणाले. सेनेतून सुरुवात केली. नंतर काँग्रेसमध्ये (Congress) होतो. आता भाजपात कायम राहणार असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं. कुणाशी दगाफटका करणं आमची सवय नाही, असंही नारायण राणे यांनी ठणकावून सांगितलं. उद्धवा, काय केलंय, रे बाबा अडीच वर्षात. आलास दोनदा मासे खायला. एकतरी प्रकल्प कोकणाला दिला का.

कोकणात प्रकल्प येताच त्याला विरोध केला जात होता. एंरॉन प्रकल्प आला. त्याला शिवसेनेनं विरोध केला. एंरॉनमध्ये काम कोणी घेतली. गाड्या कोणाच्या होत्या. कंत्राटदार कोण होते. त्यात राजन साळवी कंत्राटदार होते, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला.

कुपोषित मुलांसाठी काही केलं का. इथं शाळा काढत नाही. कॉलेज काढत नाही. शाळा, कॉलेससाठी आम्ही काम केलं. सरकारी पैशानी काम केलं नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

भाजपत आलो ही अडचण

मला फटाके काढता येतात. काढेन तेव्हा पळता भूई थोडी होतील. मी भाजपमध्ये आलो ही माझी अडचण आहे. येथे सहनशील, शांत विचारसरणीचे सगळे लोकं आहेत. आपणही त्याच्यातच बसतो. तसं व्हायला पाहिजे. तसं दाखवायला पाहिजे. म्हणून कृती करतो. याचा फायदा घेऊ, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

मुंबई मनपा २५ वर्षे लुटली

नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. आमची कोणत्या प्रकल्पात कोणती जागा आहे का सांगा. बाळासाहेबांनंतर शिवसेना फक्त टक्केवारी करणारी आहे. मुंबई महापालिका २५ वर्षे लुटली. संसार उभारले. देश-परदेशात गुंतवणूक केली, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

कोकणी माणसानं सत्ता आणली

कोकणी माणसानं घाम गाळून शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली. राज्यात शिवसेना नेली. त्या कोकणी माणसाकडे अडीच वर्षात कोणी पाहिलं नाही, अशी टीकाला नारायण राणे यांनी केली.

कसली शिवसेना मी ३९ वर्षे जवळून पाहिली. रोज ७ नंतर साहेबांसोबत बसायचो. नुकती पाहिली नाही. अनुभवली. रक्तात शिवसेना भिनवली होती. योग्य वेळी मी बोलेन, असंही त्यांनी म्हंटलं. केंद्रात कुणालाही फोन केला. तरी ते मंत्री मला एस सर म्हणतात. मी सांगितलेलं काम करतात, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.