Video | उमरगा-खामगाव महामार्गाची चाळण, खड्ड्यात बस अडकल्याने घ्यावी लागली जेसीबीची मदत

| Updated on: Aug 18, 2021 | 8:32 PM

जिल्ह्यातील पानगाव इथं रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. महामार्गाचे काम रखडल्याने गावकऱ्यांना आणि वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे येथे खड्डे झाले असून खड्ड्यात अडकलेल्या एसटी बसेस जेसीबीच्या सहाय्याने ओढून काढाव्या लागत आहेत.

Video | उमरगा-खामगाव महामार्गाची चाळण, खड्ड्यात बस अडकल्याने घ्यावी लागली जेसीबीची मदत
LATUR ROAD
Follow us on

लातूर : जिल्ह्यातील पानगाव इथं रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. उमरगा-खामगाव महामार्गाचे काम रखडल्याने गावकऱ्यांना आणि वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे येथे खड्डे झाले असून खड्ड्यात अडकलेल्या एसटी बसला जेसीबीच्या सहाय्याने ओढून बाहेर काढावे लागले आहे. (Villagers vehicles facing major problems due to delay in construction of Umarga-Khamgaon highway of latur district)

उमरगा-खामगाव या महामार्गामचे काम तातडीने पूर्ण करावे

सध्या लातूर जिल्ह्यात उमरगा-खामगाव महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र पानगाव शहरात कंत्राटदाराने कसलेही काम केलेली नाही. त्यामुळे या भागात उमगरा-खामगाव महामार्गावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे वाहन चालकांना अधिकच त्रास वाहन करावा लागत आहे. येथे बसेस, ट्रक तसेच अवजड वाहने रस्त्यावरच चिखलामध्ये आणि खड्ड्यांमध्ये फसत आहेत. या कारणामुळे उमरगा-खामगाव या महामार्गामचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी गावकरी आणि वाहनचालक करत आहेत. मागणी मान्य झाली नाही तर आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन, कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ आता बंद करा, उदयनराजेंचा घणाघात

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा, अजून कोणते महत्वाचे निर्णय?

(Villagers vehicles facing major problems due to delay in construction of Umarga-Khamgaon highway of latur district)