महापुरामुळे रायगडचं 800 कोटींचं नुकसान, आता जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा

महापुरानंतर रायगड जिल्ह्याला लोकांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. रायगडमध्ये अनेक लोक येत आहेत. मात्र, त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. (aditi tatkare)

महापुरामुळे रायगडचं 800 कोटींचं नुकसान, आता जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा
अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 31, 2021 | 2:41 PM

महाड: महापुरानंतर रायगड जिल्ह्याला लोकांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. रायगडमध्ये अनेक लोक येत आहेत. मात्र, त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. तसेच रायगडमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असं सांगतानाच रायगडमध्ये 100 डॉक्टरांचं पथक काम करत असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. तसेच महापुरामुळे जिल्ह्याचं 800 कोटी रुपयांचं नुकसानही झाल्याचं तटकरे यांनी सांगितलं. (800 crore potholes in roads, highest damage in raigad due to floods)

रायगड जिल्ह्यात बाहेरून भरपूर लोकं मदत घेऊन येत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती जास्त आहे. या शिवाय साथीचे आजार पसरण्याची भीती जास्त आहे. मात्र साथीच्या आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महाड शहर आणि जिल्ह्यात 100 डॉक्टरांची पथकं तयार करण्यात आली आहेत. औषध आणि गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्हा परिषदेला 2500 कोरोना अँन्टीजेन चाचणी किट देण्यात आल्या आहेत, असं तटकरे यांनी सांगितलं.

दुपारपर्यंत आकडेवारी येणार

जिल्ह्यात फंगल इन्फेक्शनच्या केसेस आढळायला सुरुवात झाली आहे. त्याची आकडेवारी अजून हाती आली नाही. मात्र उद्या दुपारपर्यंत जिल्ह्यातील सगळा आकडा प्रसिद्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.

जिल्ह्याला अतिरिक्त मदत करा

महापुरामुळे रायगड जिल्ह्यात साधारण 800 कोटी रुपयांच नुकसान झालं आहे गेल्या दोन वर्षात रायगडवासियांना विविध संकटांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत केली पाहिजे. तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे करून मदत लवकरात लवकर जिल्ह्याला मदत मिळायला हवी, असंही त्या म्हणाल्या.

8 महिन्यात स्थलांतर करा

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य गावांच स्थलांतर 8 महिन्यात करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तळीये ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (800 crore potholes in roads, highest damage in raigad due to floods)

संबंधित बातम्या:

काल गडकरी म्हणाले, मी जबरदस्तीने दिल्लीत, आज उद्धव म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

(800 crore potholes in roads, highest damage in raigad due to floods)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें