तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन महात्म्य असलेलं मंकावती तिर्थकुंड स्थानिक भाजप नेत्यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत तिर्थकुंडावर मालकी दाखवली.

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप
तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन महात्म्य असलेलं मंकावती तिर्थकुंड स्थानिक भाजप नेत्यांने हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संतोष जाधव

| Edited By: Akshay Adhav

Jul 31, 2021 | 1:46 PM

तुळजापूरतुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन महात्म्य असलेलं मंकावती तिर्थकुंड स्थानिक भाजप नेत्यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत तिर्थकुंडावर मालकी दाखवली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. (Tuljabhavani Tuljapur tirthkund Grabbed by False Document by BJP leader)

मंकावती कुंडाची महती प्राचीन पुराणात

1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण आणि तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर ते तिर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो. मात्र याच तिर्थकुंडावर स्थानिक भाजप नेत्याची नजर पडली आणि त्यांने तो हडपण्याचा प्रयत्न केला.

थेट तिर्थकुंड हडप करण्याचा भाजप नेत्यांचा प्रताप

भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केलाय. थेट आई भवानीचं तिर्थकुंड हडप करुन अनेक ठिकाणी मोडतोड करुन बांधकाम केलं. बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत त्यांनी या तिर्थकुंडावर मालकी दाखवलीय. भाजप नेते देवानंद रोचकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

तिर्थकुडांची मालकी नगर परिषदेची

मंकावती या भव्य तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी करून स्पष्ट झाले आहे. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे.

संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दुसरीकडे सरकारच्या नावे कागदपत्रामध्ये बदल व नोंदी करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिलेले आहेत. तर संबंधित व्यक्तींविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तसंच त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणीही केली आहे.

अहवालानंतर जिल्हाधिकारी इन अॅक्शन मोड!

महंत सावजी महाराज व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा :

पीएसआय महिलेस गच्चीवरुन फेकले, अखेर पोलीस नाईकास सात वर्षाची शिक्षा

गेल्याच वर्षी शासकिय सेवेत रुजू, 40 हजारांची लाच घेताना तरुण अधिकारी उस्मानाबादमध्ये अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें