जळगावमध्ये सोशल डिन्स्टसिंगचा फज्जा; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने, बसस्थानकांवर गर्दी होताना दिसत आहे. जळगावमध्ये देखील आज भाऊबीजेच्या दिवशी बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र या गर्दीत नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकावर येणारा एकही व्यक्ती कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नव्हता.

जळगावमध्ये सोशल डिन्स्टसिंगचा फज्जा; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

जळगाव – दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने, बसस्थानकांवर गर्दी होताना दिसत आहे. जळगावमध्ये देखील आज भाऊबीजेच्या दिवशी बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र या गर्दीत नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकावर येणारा एकही व्यक्ती कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नव्हता. कोणीही मास्क घातलेले नव्हते, तसेच गर्दी वाढल्याने सोशल डिन्स्टसिंगचा देकील फज्जा उडाला. हे प्रवासी  राज्यातील विविध भागातून आलेले असताता, त्यामुळे जर कोरोनाच्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन न झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव महापालिका आणि प्रशासनाच्या वतीने वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे, मात्र तरी देखील अनेक जण सरार्सपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका 

देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. विशेष: महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर बनली होती. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवाहार ठप्प झाले  होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता लसीकरण वाढल्याने  हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, मात्र अदयापही कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही. शासनाकडून वारंवरा कोरोनाच्या नियमांचे पलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक प्रशासनाच्या सूचनांना गांभीर्याने घते नसल्याचे चित्र आहे.  यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला धोका निर्माण झाला आहे. असेच चित्र शनिवारी जळगावच्या बसस्थानकात पाहायला मिळाले. बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र एकही प्रवासी कोरोनाचे नियम पाळताना दिसून येत नव्हता.  मात्र या प्रवाशांवर कोणाकडूनही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष.

कोरोना परिस्थिती नियंत्रणात 

दरम्यान आता हळूहळू देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या 24 तासांमध्ये अवघ्या 10,929 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 12,509 जणांनी कोरोनावर मात केली. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट 98.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत देखील घट झाली आहे.  मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा 

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार?

आर्थिक वादातून महिलेची हत्या करुन आत्महत्येचा बनाव, हत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहून घेतली

राष्ट्रवादीचे आ. अशोक पवार यांची संवेदनशीलता, कोरोनाने प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना फराळ वाटप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI