कुपोषणामुळे गंभीर आजारी चिमुकली भाग्यश्री ठणठणीत, मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून विचारपूस

| Updated on: Jun 27, 2021 | 3:58 AM

जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची प्रकृती जन्मत: कमी वजन आणि मेंदूमध्ये झालेले इन्फेक्शन यामुळे बिघडली होती. हे कळताच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने तिला उपचार मिळवून दिला.

कुपोषणामुळे गंभीर आजारी चिमुकली भाग्यश्री ठणठणीत, मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून विचारपूस
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची प्रकृती जन्मत: कमी वजन आणि मेंदूमध्ये झालेले इन्फेक्शन यामुळे बिघडली होती. हे कळताच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने तिला उपचार मिळवून दिला. तसेच याबाबत यंत्रणेला निर्देश देताना बालिकेवर चांगल्या रुग्णालयात उपचार होण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत अंगणवाडी सेविका व नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून चिमुकलीला उपचार मिळवून दिले. आता या बालिकेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे. पालकमंत्र्यांनी आज (26 जून) तिची भेट घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदतही केली (Yashomati Thakur meet and help Malnourished small girl in Devara Amaravati).

देवरा येथील भाग्यश्री या कुपोषित बालिकेला चांगल्या उपचारांची गरज होती. यासाठी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आवाहन केलं. त्यानंतर अंगणवाडी सेविका उमा वाघमारे यांच्या समन्वयाने आणि विविध नागरिक व कार्यकर्त्यांनी गावातून लोकवर्गणी गोळा केली. तसेच भाग्यश्रीच्या उपचारांचा खर्च करण्याची जबाबदारी उचलली. यानंतर भाग्यश्रीवर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. आता भाग्यश्रीची तब्येत चांगली झाली असून ती घरी परतली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी देवरा येथे भाग्यश्रीच्या घरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली. त्याचबरोबर या सर्व काळात भाग्यश्रीच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणाऱ्या आणि भाग्यश्रीच्या उपचारासाठी लोकवर्गणी गोळा करणाऱ्या अंगणवाडी सेविका कुमारी उमा वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

हेही वाचा :

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स’ जाहीर

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये मोठी वाढ, चिंता वाढली

चंद्रपुरात माय-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, उपासमार की कोरोना? कारण अस्पष्ट

व्हिडीओ पाहा :

Yashomati Thakur meet and help Malnourished small girl in Devara Amaravati