AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स’ जाहीर

जागतिक पातळीवर भूक निर्देशांकाच्या यादीत भारत 94 व्या स्थानावर आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आपल्यापेक्षा बराच वर असून जागतिक क्रमवारीत 88 व्या स्थानी आहे. (India ranks 94th in the world hunger index Pakistan has less hunger than India)

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; 'ग्लोबल हंगर इन्डेक्स' जाहीर
| Updated on: Oct 17, 2020 | 7:48 PM
Share

नवी दिल्ली  : ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स 2020’ नुकताच प्रसिद्ध झाला असून, चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. जागतिक पातळीवर भूक निर्देशांकाच्या यादीत भारत 94 व्या स्थानावर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या शेजारचा देश पाकिस्तान, आपल्यापेक्षा बराच वर असून जागतिक भूक निर्देशांकाच्या यादीत तो 88 व्या स्थानी आहे. ग्लोबल हंगर इन्डेक्स 2020 हा अहवाल कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेल्ट हंगर हिल्फी या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ही माहिती समोर अली आहे. (India ranks 94th in the world hunger index Pakistan has less hunger than India)

या अहवालात एकूण 117 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. देशातील भूकबळी, उपासमारीच्या आधारावर  117 देशांची यादी यामध्ये केलेली आहे.  उपासमारीच्या दृष्टीने 117 देशांच्या यादीत भारताचा 94 वा क्रमांक आहे. तर, पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा कमी उपासमार असल्याचे समोर आले आहे. ग्लोबल हंगर इन्डेक्समध्ये पाकिस्तान 88 व्या स्थानावर आहे. तसेच चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनही चीनने टॉप 17 देशांमध्ये स्थान मिळवलं असून चीनमध्ये भूकबळी तसेच उपासमारीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं समोर आलं आहे. म्यानमार या इन्डेक्समध्ये 78 व्या स्थानावर आहे.

भारतात उपासमारीचे प्रमाण जास्त का?

भारतात एकूण लोकसंख्येपैकी 14 टक्के लोकसंख्या कुपोषणग्रस्त आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा कमी वय असताना मुलांच्या मृत्यूचे प्रमाण हे 3.7 टक्के आहे. भारतात उपाशी राहणारे तसेच भुकेमुळे जीव गमावावा लागणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या सर्व कारणांमुळे ग्लोबल हंगर इंन्डेक्समध्ये भारताला गंभीर देशांच्या यादीत टाकण्यात आले आहे. देशात राबवल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी योग्य आणि प्रभावी पद्धतीने होत नसल्याने भारताची स्थिती गंभीर बनली असल्याचेही अहवालात म्हटले आहे. तसेच कुपोषणासारख्या गंभीर समस्येशी दोन हात करण्यासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब न केल्यामुळेही देशात उपासमारीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

युती सरकारच्या काळात कुपोषणाचे जास्त बळी, खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

शहापूरच्या कसारा भागात भूकबळी, खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये मोठी वाढ, चिंता वाढली

(India ranks 94th in the world hunger index Pakistan has less hunger than India)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.