आता तर सावलीनेही साथ सोडली, यवतमाळकरांना झाली शून्य सावलीची अनुभूती
अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात. Zero Shadow

यवतमाळ: अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात. पण, शनिवारी (22 मे) रोजी शून्य सावली हा प्रकार अनुभवायला मिळाला. शून्य सावलीची अनुभूती यवतमाळकरांना अनुभवायला भेटली. दुपारी 12 ची वेळ झाली आणि काही मिनिटे सावली ही दिशेनाशी झाली. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत हा अनुभव यवतमाळकरांनी घेतला. (Yavatmal people witnessed Zero Shadow today know details about Zero Shadow concept )
शून्य सावली म्हणजे नेमकं काय?
आपल्या पृथ्वीचा अक्ष 23.50 अंशांनी कलला असल्यामुळे आपण दक्षिणायण, उत्तरायण व दिवसाचे लहान-मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून शून्य सावलीचा अनुभव आपल्याला येतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. भारतातील काही भागांमध्ये शून्य सावली 21 मे ते 2 जून दरम्यान अनुभवता येणार आहे.
शून्य सावली आणि मुलांकडून क्रिकेटचा खेळ
यवतमाळ सह यवतमाळच्या दिग्रस मध्ये सुद्धा कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक हौशी चिमुकल्यांनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भर दुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला. तर याच शुन्य सावलीच्या अनुभवासोबतच क्रिकेट खेळण्याचाही आनंद मुलांनी घेतला.
मान्सून अंदमानमध्ये पोहोचला
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर एण्ट्री केली
नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.
40 दिवस उलटून गेले, ठाकरेंची खुर्ची शाबूत; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी हवेत विरली?https://t.co/K6ZuwoWz3P#acharyatusharbhosale | #bjp | #CMUddhavThackeray | #Maharashtra | #mahavikasaghadi | #MaharashtraGovernment
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2021
संबंधित बातम्या:
Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!
कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा
(Yavatmal people witnessed Zero Shadow today know details about Zero Shadow concept )
