AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Crime: भरदिवसा तरूणाच्या निर्घृण हत्येने कोपरगाव हादरलं, आरोपींचा शोध सुरु

राजा भोसले हा कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावातील रहिवासी आहे. कोपरगाव येथील आठवडे बाजारात राजा आला होता. यावेळी अचानक आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने राजाला मारहाण केली.

Ahmednagar Crime: भरदिवसा तरूणाच्या निर्घृण हत्येने कोपरगाव हादरलं, आरोपींचा शोध सुरु
मयत तरुण राजा भोसले
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 03, 2022 | 9:48 PM
Share

अहमदनगर : अज्ञात कारणावरुन भरदिवसा एका तरुणाची लाठ्या, काठ्यांनी मारहाण करीत आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे घडली आहे. राजा भोसले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून पोलीस ही गुन्हेगारी कशी रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आठवडे बाजारात भरदिवसा तरुणाची हत्या

राजा भोसले हा कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावातील रहिवासी आहे. कोपरगाव येथील आठवडे बाजारात राजा आला होता. यावेळी अचानक आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने राजाला मारहाण केली. एवढ्यावरच हे टोळके थांबले नाही, त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेने कोपरगाव तालुका हादरला आहे.

उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू

टोळक्याने केलेल्या मारहाणीत राजा हा गंभीर जखमी झाला होता. राजाला गंभीर जखमी करीत टोळक्याने तेथून पळ काढला.  जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राजा भोसले यास नागरिकांनी तात्काळ जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राजाचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते. त्यातील काही संतप्त लोकांनी हॉस्पिटलच्या काचा फोडल्या आणि रुग्णवाहिकेची‌ देखील तोडफोड केली.

आरोपींना अटकेसाठी नागरिकांचा रास्ता रोको

ही हत्येची घटना नेमक्या कोणत्या कारणाने घडली आणि कोणी घडवली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हत्येनंतर सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी करीत संतप्त जमावाने काही वेळ कोपरगाव शहरात रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी जमावाला आरोपींना ‌तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. (Young man beaten to death in Ahmednagar’s Kopargaon taluka)

इतर बातम्या

नागपूर: कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; चार दिवसांपासून होता घरातून बेपत्ता, घातपाताचा संशय

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?