नागपूर: कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; चार दिवसांपासून होता घरातून बेपत्ता, घातपाताचा संशय

नागपूर: कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; चार दिवसांपासून होता घरातून बेपत्ता, घातपाताचा संशय
प्रातिनिधिक छायाचित्र.

नागपूरच्या कोराडी परिसरातून बेपत्ता असलेल्या एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. हा मुलगा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 03, 2022 | 7:05 PM

नागपूर : नागपूरच्या कोराडी परिसरातून बेपत्ता असलेल्या एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. हा मुलगा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्यची तक्रार दिली होती.

एक जानेवारीपासून बेपत्ता

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून या चिमुकल्याचा शोध सुरू होता. अखेर या मुलाचा मृतदेह नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. हा मुलगा एक जानेवारीला घरातून बेपत्ता झाला होता. एक जानेवारीपासून पोलीस आणि त्याचे कुटुंबीय या मुलाचा शोध घेत होते. मात्र हा मलगा कुठेच आढळून आला नाही. आज पुन्हा एकदा पोलिसांनी शोधमोहिमेला सुरुवात केली. शोध सुरू असताना एका कॅनॉलमध्ये या मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.

अपहरणाचा गुन्हा दाखल

दरम्यान या मुलाचे अपहरण झाले असावे असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी प्राथमिक स्तरावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुलगा अचानक बेपत्ता कसा झाला. या मागे काही घातपात आहे का? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया

Viral | झिंगाट जोडप्याचा रोमान्स सुसाट, धावत्या बाईकवर आधी मिठी मारली आणि मग ओठांनी…

Video : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें