नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनादिवशीचं पोलिसांवर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. या तरुणीच्या घरासमोर श्वानानं विष्टा केली म्हणून तिने गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये इतरांनी दाखल केली, यावेळी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, त्यानंतर या तरुणीने अर्वाच्य भाषेत पोलिसांनाच शिवीगाळ केली, पोलीस स्टेशनमधील कर्मचारी मात्र हात बांधून उभे असल्याचे यावेळी दिसून आले. या तरुणीविरोधात कर्वेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस ठाण्यातच खाकीवर हात उलण्याची हिंमत या तरुणीने कशी केली? पुणे पोलिसांच्या खाकीचा धाक आता राहिला नाही का? असे एक ना अनेक सवाल या प्रकाराने उपस्थित होत आहेत.