AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला का फटकारलं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन, भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यावरुन वाद सुरु झालेला असताना सुप्रीम कोर्टानंही राज्य सरकारला फटकारलं आहे.

अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला का फटकारलं
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 13, 2024 | 9:29 PM
Share

लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. कोणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जमिनीच्या मोबदल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं लाडकी बहीण योजनेवरुन इशारा दिला आहे. पुण्यातल्या जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला धारेवर धरलंय. मोफत वीज, लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत मग जमिनीचा मोबदला देण्यासाठी का नाही ? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे.

‘अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू’

बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं. याचिकाकर्ते टी एन गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950साली 24 एकर जमीन घेतली होती. राज्य सरकारनं ही जमीन घेतली परंतू मोबदला न मिळाल्यानं याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घ्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे.

दुसरीकडे सरकारचेच आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय. निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर, 1500 रुपये परत घेवू असं रवी राणा म्हणाले. मात्र वक्तव्य अंगलट येताच राणांनी आपण गंमतीनं बोलल्याचं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी जाहीर सभेत ऐकवली क्लिप

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनीही विधानसभेत विरोधात काम केल्यास डिसेंबर महिन्यात छाणणीत अर्ज बाद होतील, असा धमकीवजा इशाराच दिला. तीच क्लीप सुप्रिया सुळेंनी आपल्या जाहीर सभेतही ऐकवली.

सरकारकडून विशेषत: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. आता 18 तारखेला राखीच्या दिवशी फडणवीस महिलांशी संवाद साधणार आहेत. लाडक्या बहिणींचा देवाभाऊ, असं कार्यक्रम भाजपनं आखलाय. पण त्याचवेळी रवी राणा आणि महेश शिंदेंनी आपल्या वक्तव्यानं सरकारला अडचणीत आणलं आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?