पोटनिवडणुकीने पंढरपुरात वात पेटवली; आमदार संजय शिंदे,अमोल मिटकरी, रणजीतसिंहांना कोरोना, 1800 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण

| Updated on: Apr 22, 2021 | 7:35 PM

पंढरपूर मंगळवेढ्यात ज्या-ज्या गावात सभा झाल्या होत्या; ती गावं कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. (pandharpur mangalwedha corona patients)

पोटनिवडणुकीने पंढरपुरात वात पेटवली; आमदार संजय शिंदे,अमोल मिटकरी, रणजीतसिंहांना कोरोना, 1800 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण
pandharpur mangalwedha by election
Follow us on

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur Mangalwedha by election) मोठ्या जोशात राबवली गेली. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जोमात प्रचार केला. ऐन कोरोनाकाळात (Corona) मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी,  भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या  सर्व नेत्यांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपूर मंगळवेढ्यात प्रचार केला होता. प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांची ज्या-ज्या गावात सभा झाल्या होत्या; ती गावं कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. (Pandharpur Mangalwedha Corona patients increasing after the state assembly by election Prashant Paricharak demand mass vaccination)

दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आता कोरोनाचा मोठ्या स्वरुपात प्रसार

17 एप्रिल रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता गेल्या चार दिवसापांसून या मतदारसंघामध्ये एक हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या बड्या नेत्यांनी येथे मोठ्या प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभांमध्ये मतदारसंघात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. या सभांमध्ये कोणत्याही कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्याचच परिणाम म्हणून की काय मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, भोसे, लवंगी ही गावं कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत.

प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना कोरोनाची लागण

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक संपताच दोन्ही तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. येथे प्रचारासाठी आलेल्या आमदार संजय शिंदे ,अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लसीकरण केंद्रं वाढवावी- प्रशांत परिचारक

या मतदारसंघात कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्यामुळे आता येथे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा भासत आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी लस ही अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप होत आहे. तसा आरोप विधानपरिषेदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे. तसेच, मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात लसीकरण केंद्रं वाढवावी आणि जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीसुद्दा त्यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्यात तब्बल अठराशे रुग्णांवर उपचार

दरम्यान, पंढरपूर, मंगळवेढा परिसरात 21 एप्रिल रोजी तब्बल अडीचशे नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या येथे एकूण तब्बल अठराशे रुग्णांवर उपचार सुरु आहेत. येथेरुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या मतदारसंघात लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिक जिल्ह्यातील येवला येथे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध, टीव्ही 9 च्या बातमीचा इम्पॅक्ट

गरज 60 हजारांची, मिळणार फक्त 26 हजार, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज, केंद्राला पत्र लिहणार

Maharashtra Lockdown Guidelines | मुंबई लोकल असो की बस, कोणाला प्रवासा करता येणार? संपूर्ण नियमावली

(Pandharpur Mangalwedha Corona patients increasing after the state assembly by election Prashant Paricharak demand mass vaccination)