AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारखा गूढ आवाज येतोय… चार दिवसापासून प्रचंड दहशत; पंढरपूरकर हादरले

पंढरपुरात गेल्या चार दिवसांपासून गूढ आणि तीव्र आवाज येत आहे, ज्यामुळे शहर दहशतीखाली आहे. दार-खिडक्या हादरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या अज्ञात आवाजाचे कारण अस्पष्ट असून, भूकंपाची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस माहिती न मिळाल्याने नागरिक तातडीने चौकशीची मागणी करत आहेत.

सारखा गूढ आवाज येतोय... चार दिवसापासून प्रचंड दहशत; पंढरपूरकर हादरले
पंढरपूरमध्ये गूढ आणि तीव्र आवाज
| Updated on: Jan 19, 2026 | 2:09 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकर गेल्या चार दिवसापासून भीतीच्या छायेत आहेत. कारण पंढरपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून गूढ आवाज येत आहे. हा आवाज का येत आहे? कशाचा आहे? याची काहीच माहिती नाहीये. पण वारंवार आवाज येत असल्याने काही तरी आक्रित घडणार का? अशी भीती पंढरपूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अख्खं शहर हादरून गेलं आहे. त्यातच प्रशासनाकडूनही म्हणावी तशी पावलं उचलली जात नसल्याने येथील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून अचानक हा आवाज येत आहे. नुसता गूढ आवाज येत नाहीये तर तो प्रचंड असा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण रोज हा आवाज येत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात येत असल्याने येथील नागरिक हादरून गेले आहेत. अनेकांना तर रात्रीची झोपही लागत नाहीये.

दारं खिडक्या हलल्या

हा आवाज इतका तीव्र आहे की अनेक ठिकाणी घरांच्या दार-खिडक्या हादरत असल्याचं नागरिक सांगत आहेत. अचानक घरांची दारं आणि खिडक्या हादरायला लागल्याने नागरिकांमध्ये अधिकच भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. विशेष म्हणजे हा आवाज नेमका कुठून येतो? कशामुळे येतो? याबाबत प्रशासनालाही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गेल्या चार दिवसात आवाजाचा काहीच मागमूस लागलेला नाहीये, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ बिथरले आहेत.

चौकशी करा

या गूढ आवाजाबाबत सोशल मीडियावरही विविध तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे हा आवाज कशाचा येतो? त्याचे कारण काय? त्यामुळे जीवित वा वित्तहानी तर होणार नाही ना? ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना? असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे या गूढ आणि प्रचंड आवाजाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भूकंप तर नाही ?

या गूढ आवाजामुळे अनेकजण तर्कवितर्क लढवत आहेत. या आवाजामुळे अनेकांना भूकंप होण्याची भीती वाटत आहे. भूकंप वगैरे तर होणार नाही ना? याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून या आवाजाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.