AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

राज्यात आणखी एक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. कारण अजूनही धूर, धुकं अजूनही आलेलं नाही. 20 ते 23 ऑक्टोबरच्या काळात राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस येईल. सध्यातरी 17 ऑक्टोबरनंतर राज्यात पाऊस होणार नाही, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.

Rain Update : हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; 'जीवदान' ठरणारा हवामान अंदाज समोर
panjabrao dakh weather updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 9:16 PM
Share

Maharashtra Rain Update : दुष्काळझळांनी शेतकरी होरपळून गेलाय. राज्य सरकारने अधिकृतपणे महाराष्ट्रातील बहुसंख्य तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलाय. खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी हताश होऊन उभ्या पिकावर नांगर फिरवलाय. आता मायबाप सरकारनेच आम्हाला मदत करावी, अशी विनवणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. खरीप हंगाम हातातून गेला असला तरीही आता रबी हंगामात तरी पाऊस बरसावा अशी शेतकरी आस लावून बसले आहेत. रबी हंगाम हाताशी लागला तर शेतकऱ्यांचे दु:ख कमी होऊ शकते. दरम्यान, आता रबी हंगामातील पेरण्या आणि या हंगामासाठी पोषक ठरणाऱ्या पावसाबद्दल हवामानविषयक माहिती देणारे पंजाब डख यांनी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय. रबी हंगामाला जीवदान देणार एक परतीचा पाऊस पडले, असं डख यांनी सांगितलंय.

18 ऑक्टोबर रोजीनंतर वातावरणात बदल होईल

परतीचा एक पाऊस येणार आहे. या पावसामुळे रबीची पेरणी होईल. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या पावसाचे वातावरण नाही. 18 ऑक्टोबर रोजीनंतर वातावरणात बदल होईल. 20 ते 24 ऑक्टोबरच्या काळात पाऊस होईल. हा परतीचा पाऊस निर्णायक असेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

जोपर्यंत धुकं येत नाही तोपर्यंत…

पाऊस गेला की एक परतीचा पाऊस येतो. या पावसामुळे रबी पिकांच्या पेरणीसाठी जीवदानच मिळते. सध्या पाऊस थांबलेला आहे. पाऊस येणार नाही, असं अनेकांना वाटतंय. जोपर्यंत धुकं येत नाही तोपर्यंत थंडीला सुरुवात होत नाही. दसऱ्याच्या दिवसापासून ते पुढच्या चार दिवस पावसाचा राज्यात मुक्काम असेल, असेही डख यांनी सांगितले.

सध्यातरी 17 ऑक्टोबरनंतर राज्यात पाऊस नाही

राज्यात आणखी एक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. कारण अजूनही धूर, धुकं अजूनही आलेलं नाही. 20 ते 23 ऑक्टोबरच्या काळात राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस येईल. सध्यातरी 17 ऑक्टोबरनंतर राज्यात पाऊस होणार नाही. दरम्यान, सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शेतातील पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. सोबतच आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिलंय.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान