AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांचं वेगळ्या पक्षाच्या वक्तव्यावर अखेर स्पष्टीकरण, म्हणाल्या मी वेडी…

मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

पंकजा मुंडे यांचं वेगळ्या पक्षाच्या वक्तव्यावर अखेर स्पष्टीकरण, म्हणाल्या मी वेडी...
| Updated on: Feb 10, 2025 | 5:57 PM
Share

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी काल एक वक्तव्य केलं होतं.  मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील असं त्यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, त्यानंतर आता त्यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी काय दुसरा पक्ष स्थापन करायला वेडी आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

मी म्हटले की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील. पक्ष उभाच आहेना भाजप. मुंडे साहेबांनी सुरुवातीपासून पक्षासाठी काम केलं, आणि तो उभा केला आहे. मुंडे साहेबांवर लोक प्रचंड प्रेम करतात.  अशा अर्थाने मी ते वाक्य बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी घातला. त्याच पक्षात त्यांनी शेवटचा विसावा घेतला. लगेच एका चॅनलने चालवलं, पकंजाताई म्हणाल्या पक्ष स्थापन करणार. आता मी काय वेडी आहे   का? वेगळा पक्ष स्थापन करायला. अरे मी वेगळा पक्ष कसा स्थापन करेल? दिल्लीत मोदी आहेत, इथे फडणवीस आहेत. खाली वर दोन्हीकडे आमची सत्ता आहे. मी मंत्री आहे. मग मी असं कशामुळे करेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी रागवले म्हणून आज फटाके फुटले नाहीत. जेव्हा तुम्ही माझ्यावर जेसीबीनं फुलं वाहतात तेव्हा मला प्रत्येक पाकळी एक एक टनाची वाटते. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून तुम्ही सर्व जण माझ्यावर खूप प्रेम करत आहात.  तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आणि माऊल्या आहात. मी प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देणार आहे. आता मी मंत्रिमंडळात आहे, प्रत्येक जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मला आष्टीवर  जास्त प्रेम करावं लागेल, कारण परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं