AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो

महाराष्ट्रात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाहीये, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांचा दुष्काळ पहाणी दौरा सुरू आहे. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो
Pankaja MundeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 3:05 PM
Share

महाराष्ट्रात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाहीये, पावसाभावी पिकं वाळून गेली. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीच पिकली नाही तर आता जगायचं कसं असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. दरम्यान संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 265 तालुक्यांचा समावेश हा दुष्काळ क्षेत्रात करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिंधीचे दुष्काळ दौरे सुरू आहेत. आज जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या दुष्काळ दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने टाहो फोडल्याचं पहायला मिळालं. यावेळी पंकजा मुंडे यांनी संबंधित शेतकऱ्याला धीर देत पाणी पाजलं.

राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जालन्याच्या पालकमंत्री पकंजा मुंडे यांच्याकडून  दुष्काळी भागाची पाहाणी सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव आणि गेवराई शिवारात सोयाबीन पिकांची पाहणी  केली.  यावेळी पंकजा मुंडे सोयाबीनच्या शेतामध्ये दाखल होताच कडेगाव येथील दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना पंकजा मुंडे यांच्या समोरच रडू कोसळलं, त्यावेळी पंकजा मुंडे यांनी या शेतकऱ्याला धीर देत पाणी पाजलं.  राज्यात पावसाभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी पिकांचा देखील कोणताही भरोसा नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर

यंदा राज्यात पावसाभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.  या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान आता सरकारकडून दुष्काळी भागातील जनतेसाठी विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत अन्न धान्य वाटप, विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ, तसेच जनावरांसाठी चारा वाटप, अशा विविध योजना राबवण्यात येणार आहेत.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...