Parbhani Disabled Wedding : जगात जर्मनी आणि भारतात परभणी, दिव्यांगांचा रेकॉर्डब्रेक विवाह सोहळा

| Updated on: May 11, 2022 | 5:04 PM

मोठ्या संख्येने वराडी, वधू-वर यांचे नातेवाईक उपस्थित होते. या विवाहसोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे परभणीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड झाला आहे.

Parbhani Disabled Wedding : जगात जर्मनी आणि भारतात परभणी, दिव्यांगांचा रेकॉर्डब्रेक विवाह सोहळा
दिव्यांगांचा रेकॉर्डब्रेक विवाह सोहळा
Image Credit source: tv9
Follow us on

परभणी : जगात जर्मनी (Germany) आणि भारतात परभणी (Parbhani) ही म्हण अनेक वर्षांपासून ऐकत आलोय. हीच म्हण परभणीने पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे. कारण परभणीतल्या एका विवाह सोहळ्याने मोठं रेकॉर्ड (Parbhani Disabled Wedding) तोडलं आहे. परभणी येथे शिवसेनेच्या वतीने, आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय दिव्यांग विवाह सोहळ्यात, 31 जोडप्यांचा विवाह पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सामाजिक न्याय आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावत नव वधू-वरास आशीर्वाद दिले. यावेळी मोठ्या संख्येने वराडी, वधू-वर यांचे नातेवाईक उपस्थित होते. या विवाहसोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे परभणीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड झाला आहे.

धनंजय मुंडे विवाहसोहळ्याबाबत म्हणतात…

या विवाह सोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाल्याचं कळाल्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनीही तशीच प्रतिक्रिया दिली आहे. दिव्यांगांच्या विवाहसोहळ्यानंतर पुन्हा जगात जर्मनी भारतात परभणी म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तसेच या विवाह सोहळ्यात आल्याने पालकमंत्री म्हणून आनंद होत आहे. सर्व नावदाम्पत्यांना शुभेच्छा देतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. नवाब मलिक हे जमीन गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये गेल्यानंतर परभणीचे पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता परभणीची अतिरिक्त जबाबादारी ही त्यांच्यावर आली आहे. त्यांनी या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावत आपली जबाबदारी पार पाडली आहे.

लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा

राज्यात या विवाहसोहळ्याची चांगलीच चर्चा आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा क्षण असतो. लग्नसोहळ्यापासून एका नव्या आयुष्याची सुरूवात होत असते. दोन लोक या लग्नसोहळ्याने एकमेकांबरोबर आयुष्यभर राहण्याची आणि प्रत्येक क्षणी साथ देण्याची वचनं देत असतात. दिव्यांगाना काही मर्यादा असल्याने त्यांच्यासाठी खडतर आयुष्यातून मार्ग काढण्याचा हा एक दिव्य सोहळा असतो. आपले लग्न खासरित्या व्हावे आणि लग्नाची चर्चा व्हावी असे सर्वांनाच वाटत असते. अशा पद्धतीने थाटामाटात लग्न होणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यात लग्नाची अशी भन्नाट चर्चा होणे आणि आपल्या लग्नात असे काही तरी रेकॉर्ड बनल्यावर हा क्षण आणखी खास होऊन जातो.

हे सुद्धा वाचा