Raj Thackeray: राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, सांगलीनंतर परळी कोर्टाचं राज यांना अजामीन वॉरंट

| Updated on: May 06, 2022 | 12:41 PM

Raj Thackeray: सांगलीनंतर परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज यांची डोकेदुखी वाढली आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, सांगलीनंतर परळी कोर्टाचं राज यांना अजामीन वॉरंट
सांगलीनंतर परळी कोर्टाचं राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. सांगलीनंतर परळी कोर्टाने (parli court) राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज यांची डोकेदुखी वाढली आहे. राज ठाकरे यांनी मराठी पाट्या आणि मराठीच्या (marathi) मुद्द्यावर आंदोलन केलं होतं.या प्रकरणी पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. या प्रकरणी परळी कोर्टाकडून मुंबई पोलिसांना पत्रं पाठवलं होतं. पण त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने कोर्टाने अखेर त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, राज ठाकरे हे याप्रकरणी कोणते पाऊल उचलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. आधीच भोंग्याच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या राज ठाकरे यांना आता जुन्या प्रकरणावरून अजामीनपात्रं वॉरंट जारी करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

या आधी सांगलीच्या शिराळा कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्रं वॉरंट जारी केलं होतं. मराठी पाट्या आणि मराठीच्या आंदोलनप्रकरणी राज यांना शिराळा कोर्टाने वॉरंट जारी केलं होतं. आज परळी कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भोंग्यांवरूनही अडचणीत

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भोंग्याचा विषय हाती घेतला आहे. मशिदीवरील भोंग्यांविरोधात त्यांनी आक्रमकपणे भाषणे दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यातील काही भागात गुन्हे दाखल झाले आहेत. भोंग्याचं आंदोलन आणि त्यावरून कारवाईची टांगती तलवार असतानाच आता राज यांच्यावर जुन्या प्रकरणाप्रकरणी वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

अयोध्येची तयारी सुरू

राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. राज यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राज यांच्यासोबत मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि मनसैनिकही जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेचे नेतेही अयोध्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत.