पवनराजे हत्याकांड प्रकरण… पद्मसिंह पाटलांच्या सुनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या… सत्याचा विजय, पण आमचं राजकीय करिअर…
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून, पद्मसिंह पाटील व ८ आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत. सबळ पुराव्याअभावी ही निर्दोष मुक्तता झाली. पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबासाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. अर्चना पाटील यांनी या निकालाला 'सत्याचा विजय' म्हटले, पण गेलेल्या वर्षांचे दुःखही व्यक्त केले. २० वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर न्याय मिळाला, असे त्या म्हणाल्या.

अख्ख्या राज्याचे लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल अखेर लागल आहे. कोर्टाने आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे .सबळ पुराव्या अभावी या आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं. वनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील या निकालामुळे ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे, मात्र पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबासाठी हा निकाल अतिशय दिलासादायक ठरला आहे. कोर्टाच्य या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांची सून, अर्चना पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अखेर सत्याचा विजय झाला, या निकालाने आम्ही समाधानी आहोत, असं म्हणत अर्चना पाटील यांनी समाधाना व्यक्त केलं. शेवट उशिरा झाला, पण सत्याचा विजय झाला. न्याय मिळाला असं म्हणत अर्चना पटील यांनी कोर्टाचे आभार मानले.
गेलेली वर्ष भरून निघणार नाही, माझे सासरे, मुलांना त्रास झाला त्याचं काय ?
कोर्टाच्या निकालानंतर अर्चना पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. सत्याचा विजय झाला. २० वर्षापासून खटला सुरू. माझी मुलं लहान होती. माझी सासू आणि आम्ही टेन्शनमध्ये होतो. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मुलांवर परिणाम झाला. राजकीय करिअर बर्बाद झाला. ओरडून सांगितलं म्हणजे खरं होत नाही. सत्याचा विजय झाला. पण गेलेली वर्ष भरून निघणार नाही. माझे सासरे आणि मुलांना त्रास झाला. त्यांचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काय भावना आहेत हे सांगता येत नाही. पण निकालाने आम्ही समाधानी आहोत, असंही त्या पुढे म्हणाल्या.
निर्दोष असताना आम्ही राजकीय मानसिक छळ सोसला
या प्रकरणामध्ये आम्हाला मानसिक त्रास अधिक झाला. राजकीयदृष्ट्या आम्ही दोघांनी स्ट्रगल केला. लोक घराणेशाही म्हणतात. पण आम्ही निर्दोष असताना आम्हाला राजकीय मानसिक छळ सोसावा लागला. राणादादाचा मुलगा म्हणून आम्ही लोकांची कामे त्वेषाने काम केलं. पण पाठी मागे दु:ख, चीड, त्रास होता. ग्रामपंचायतीचं इलेक्शन असो की जिल्हा परिषदेचं. काही लोकं तोच मुद्दा काढत होते. मी तर निवडणुकीत हाताता मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते. शपथा घेत होते. आम्ही कुणाचा खून केला नाही हे सांगत होते. खूप त्रास झाला असं अर्चना पाटील यांनी सांगितलं.
शेवट उशिरा पण सत्याचा विजय
निकाल, शेवट उशिरा झाला. पण सत्याचा विजय झाला. न्याय मिळाला. आम्ही कोर्टाचे आभार मानतो, असं त्यांनी नमूद केलं. राजकीय वाटचाल चांगली आहे. आम्ही जास्त जोमाने काम करणार आहोत. डॉ. पद्मसिंह पाटील हे गृहमंत्री होते. त्यांच्यावर खोटे आरोप केले. पुढचे मुख्यमंत्री म्हणून गणले जात होते. राजकीयदृष्ट्या त्यांचं नुकसान केलं गेलं. लातूरला मुख्यमंत्रीपद मिळालं. धाराशिवला मिळालं असतं. पण त्यांना राजकारणातून खेचलं. पद्मसिंह पाटील ८५ वर्षाचे झाले. ते जाण्याआधी निर्णय आला. आता आम्ही राजकीय दृष्ट्याचा विचार करत नाही. तेव्हा वाईट वाटायचं. आम्ही डॉ. पद्मसिंह पाटलांचा वारसा जपला आहे. तो पुढे नेत आहोत, असंही अर्चना पाटील यांनी सांगितलं.